वनामकृवितील सेंद्रीय
शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचा उपक्रम
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या
वतीने कृषिदिनाचे औचित्य साधून दिनांक 1 जुलै रोजी विद्यापीठ निर्मित सेंद्रीय तूरदाळ
विक्रीचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व परभणी जिल्हाधिकारी मा. श्री. दीपक
मुगळीकर यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद
वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री राजेश
काटकर, मनपा आयुक्त श्री देवीदास पवार, कुलसचिव डॉ.
धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, डॉ श्रीकृष्ण
कात्नेश्वरकर, डॉ. केदार खटींग, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड मंचकराव
सोळंके, विभागीय वन अधिकारी श्री. पी सी वाघचौरे, प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव आवचार, श्री
प्रताप काळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मनोगतात कुलगुरू
मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, कृषिदिनाचे औचीत्य साधुन विद्यापीठ निर्मित सेंद्रीय तुरदाळ
विक्रीस प्रारंभ करण्यात येत असुन लोकांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी
विषमुक्त अन्न तयार करणे तसेच सेंद्रीय शेतमालाबाबत ग्राहकांचे प्रबोधन करणे हा
उदे्दश आहे. सेंद्रीय शेती ही एक व्यापक संकल्पना असून विद्यापीठातील संशोधन
केंद्राच्या माध्यमातुन पीकनिहाय एकात्मिक पीक उत्पादन तंत्रज्ञान विकसीत
करण्यात येत आहे. सेंद्रीय शेतमालाची उत्पादनाची
विश्वासर्हता निर्माण करण्याकरिता उत्पादक व ग्राहक यांचात समन्वय घडवुन आणावा
लागेल.
जिल्हाधिकारी मा श्री दिपक मुगळीकर म्हणाले की, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विद्यापीठ करित असलेला सेंद्रीय शेतमाल विक्री उपक्रम चांगला असुन प्रबोधनाच्या माध्यमातुन विषमुक्त अन्न निर्मितीला चालना मिळेल.
सेंद्रीय शेती
संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने सेंद्रीय शेतीमध्ये संशोधन आणि प्रशिक्षण
कार्य करण्यात येते, केंद्राच्या प्रक्षेत्रावरील उत्पादित तूर पिकापासून
सेंद्रीय तूरदाळ तयार करण्यात आली. ही सेंद्रीय तूर दाळ विक्रीसाठी उपलब्ध करुन
देण्यात येत आहे. यावेळी कुलगुरु मा डॉ अशोक ढवण व परभणी जिल्हाधिकारी मा श्री
दीपक मुगळीकर यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात शहरातील नागरीकांना तूरदाळ वितरीत
करुन विक्रीचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. आंनद गोरे यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ. स्मिता खोडके यांनी केले. कार्यक्रमास विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्रभारी अधिकारी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, प्रगतशील शेतकरी ज्योतीबा कानडे, पवन रेंगे, बबनराव देशमुख, श्री. पवार आदीसह शहरातील नागरीक आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी बी सुर्यवंशी, प्रल्हाद गायकवाड, सतिश कटारे, अभिजित कदम, डॉ सुनिल जावळे, डॉ माणिक राखोंडे, श्रीधर पतंगे, दशरथ गरुड, भागवत वाघ, सचिन रनेर, योगेश थोरवट आदीं परिश्रम घेतले.