वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जयश्री झेंड या विद्यापीठास दिर्घकाळ सेवा प्रदान करून दिनांक ३० जुन रोजी सेवानिवृत्त झाल्या, त्यानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने त्यांना सपतीक सत्कार करून निरोप देण्यात आला तर नवनियुक्त सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.जया बंगाळे यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले हे होते.
अध्यक्षीय समारोपात मा.कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी डॉ. जयश्री झेंड यांच्या शेतक–यांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानांचा उल्लेख करत आपल्या शुभेच्छा देताना त्यांच्या संशोधन कार्याची प्रशंसा केली. याबरोबरच नवनियुक्त सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.जया बंगाळे यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे डॉ. धर्मराज गोखले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ.जयश्री झेंड यांच्या कार्याबाबत गौरवदगार काढून त्यांना शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना डॉ.जयश्री झेंड म्हणाल्या की, माझ्या आयुष्याचा दिर्घकाळ म्हणजे ३८ वर्षाची विद्यापीठ सेवा व पदवीचे चार वर्ष अशी एकूण बेचाळीस वर्ष या विद्यापिठासाठी कार्य केले, त्यामुळे मला अनेक सन्मानासह समाधानही प्राप्त झाले. विद्यापीठाने विविध व्यासपीठाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या संधी बद्दल त्यांनी विद्यापीठाचे आभार मानले.
मनोगतात नवनियुक्त प्राचार्या डॉ.जया बंगाळे यांनी डॉ.जयश्री झेंड यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत स्वतःच्या कार्यकाळात महाविद्यालयाच्या उज्वल भरभराटीसाठी सदैव प्रयत्नशील असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमात डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी प्राचार्य डॉ. जयश्री झेंड यांच्या मानपत्राचे वाचन केले.याद्वारे त्यांच्या कार्याचा उल्लेख तसेच त्यांच्या बालपणापासून ते निवृत्तीपर्यंतच्या कालखंडातील संस्मरणीय आठवणींचा उजाळा सादर करण्यात आला. महाविद्यालतील प्राध्यापक, सहकारी व कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वीणा भालेराव यांनी तर आभार डॉ.सुनिता काळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्विततेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.