वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागात कार्यरत प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक ६ जुलै रोजी पालक कार्यशाळा ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाली. कार्यक्रमात प्रमुख वक्त्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ जया बंगाळे यांनी उपस्थित पालकांना "बालविकासात पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व" याविषयी मार्गदर्शन करतांना बालवयाचे महत्त्व, सर्वागीण विकासासाठी कुटुंबातील पोषक वातावरण कसे असावे तसेच नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली.सहयोगी प्राध्यापक प्रा.निता गायकवाड यांनी प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक कार्याची पालकांना ओळख करून दिली तर शाळेच्या प्रमुख वित्त समन्वयिका सहयोगी प्राध्यापक डॉ वीणा भालेराव यांनी प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेची वैशिष्ट्ये तथा नियमावली याविषयी पालकांना सूचना दिल्या. कार्यशाळेत पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना कोरोना प्रकोपात शाळेतर्फे राबवण्यात येणाऱ्या माझे घर-माझी शाळा या उपक्रमाची प्रशंसा करत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन शिक्षिका श्रुती औढेकर यांनी केले तर आभार शिक्षिका वर्षा लोंढे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी वैशाली जोशी, मिनाक्षी सालगोडे आदीसह कार्यालयीन कर्मचारी व मदतनीस यांनी परिश्रम घेतले. ऑनलाईन कार्यशाळेस पालक उपस्थित होते.