वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा
सुवर्ण महोत्सवी वर्ष
निमित्त अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प - गृहविज्ञान
योजनेच्या वतीने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन उपक्रम
अंतर्गत ३०० आंबा याची रोपे, ५०० आंब्याच्या
कोयी, फणस बिया आदी
विद्यापीठातील उद्यानविद्या संशोधन
योजना विभागाला देण्यात आली. सदरिल रोपांवर उद्यानविद्या फळबाग संशोधन योजना विभागात योग्य ती प्रक्रीया करुन त्यांची विद्यापीठाच्या परिसरात
लागवड करण्यात येणार आहे. कार्यक्रमास वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. निता गायकवाड, उद्यानविद्या फळबाग संशोधन योजना येथील प्रभारी अधिकारी डॉ.
व्ही. एस.खंदारे, डॉ.
शंकर पुरी आदींची
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना प्रा. निता गायकवाड म्हणाल्या की, लावलेले एक वृक्ष पुढील कित्येक पिढयांसाठी वरदान ठरु शकते, त्यामुळे सर्वांनी केवळ वृक्षलागवडीसाठीच नाही तर वृक्ष जोपासण्यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजे दैनंदिन जीवनात जेव्हा विविध प्रकारची फळे खातो त्या सर्वांच्या बिया-कोयी यांचे संकलन करुन ते रोपवाटीकेकडे सुपुर्द कराव्यात. तर डॉ. व्ही. एस.खंदारे यांनी अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प - गृहविज्ञान योजनेच्या उपक्रमाबाबत आभार म्हणाले. कार्यक्रमास संगीता नाईक, रूपाली पतंगे, धनश्री चव्हाण, मनिषा क-हाळे, शितल मोरे, तोडकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री माटे, मुरली शिंदे यांनी सहाय्य केले.