वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक आणि नवी
दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण
प्रकल्प (नाहेप) यांच्या विद्यमाने “विविध पिकांचे गुणवत्तापुर्वक
बीजोत्पादन व प्रमाणीकरण” या विषयावर एक आठवडीय राष्ट्रीय
प्रशिक्षणाचे दिनांक १० ते १५ ऑक्टोबर दरम्यान आयोजन केले आहे. सदर प्रशिक्षण बीजोत्पादन
व या क्षेत्रातील संधी संबंधीत कौशल्य वृध्दिंगत करणे हा उद्देश ठेवुन कृषि विद्यापीठातील
पदव्युत्तर, आचार्य विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ
तथा कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा
उदघाटन समारंभ दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आयोजित केला असुन कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे राहणार असुन अकोला येथील महाबीजचे
व्यवस्थापकीय संचालक डॉ संतोष आळसे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, मुख्य
वक्ते कांदा व लसुण संशोधन केंद्राचे संचालक डॉ. विजय महाजन, केहाळ येथील प्रगतशील
शेतकरी श्री. मधुकर घुगे हे उपस्थित राहणार आहेत.
प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि व शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असुन प्रशिक्षणा राष्ट्रीय पातळीवरील बीजोत्पादन क्षेत्रातील नामांकित २४ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणासाठी विविध महाविद्यालयातुन पदव्युत्तर, आचार्य विद्यार्थी, प्राध्यापक, विद्यापीठ शास्त्रज्ञ तथा कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी नोंदणी केलेली आहे, अशी माहिती प्रशिक्षणाचे आयोजक डॉ. राजेश कदम, डॉ. गोदावरी पवार, इंजी. संजय पवार व डॉ. मेघा जगताप यांनी दिली आहे.