वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाअंतर्गत कार्यरत प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत दिनांक ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सामूदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता तथा मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाच्या प्रमुख डॉ. जया बंगाळे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिव्यांग बालकांमध्ये असणाऱ्या विविध कलागुणांची ओळख करून दिली. तसेच कुटुंबात व समाजात आढळून येणाऱ्या अशा व्यक्तींना आपल्यामध्ये सामावून घेत प्रत्येकाने त्यांना वेळोवेळी मदत करण्याविषयी आवाहन केले. याप्रसंगी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी विभागातील प्राध्यापक डॉ. वीणा भालेराव, प्रा. प्रियंका स्वामी तसेच विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षिका श्रुती औढेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी शाळेतील सर्व शिक्षिका तसेच मदतनीस यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.