मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विस्तार व संवाद व्यवस्थापन विभागाच्या वतीने भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली प्रायोचित 'विस्ताराकांसाठी संवाद व व्यवस्थापन कौशल्य' या विषयावर दहा दिवसीय लहू-प्रशिक्षणाचे १६ ते २५ जानेवारी २०१३ दरम्यान आयोचन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन दि १६ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत हॉल क्रमांक १८ मध्ये सकाळी ११.०० वाजता हैद्राबाद येथील विभागीय प्रकल्प संचालक मा. डॉ. एन. सुधाकर यांच्या हस्ते होणार असून विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. किशनराव गोरे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात देशातील विविध कृषी विद्यापीठातील २५ शास्त्रज्ञ, प्राध्यापक व विस्तारक सहभागी होणार आहेत. या प्रशिक्षणात विस्ताराकांसाठी आव्यशक संवाद व व्यवस्थापन कौशल्य, माहिती तंत्रज्ञानाचा कृषी विकासात उपयोग, व्यक्तीमत्व विकास, विविध प्रसारमाध्यमांसाठी आव्यशक कौशल्य या विषयावर मार्गदर्शन विविध क्षेत्रातील तज्ञ करणार आहेत. या उदघाटन कार्यक्रमास नागरिक, विद्यार्धी, प्राध्यापक व कर्मचारी आदींनी उपस्थिती रहावे असे आवाहन गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा विशाला पट्टणम व विभाग प्रमुख डॉ प्रभा अंतवाल यांनी केले आहे.