भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्ये पुढील आठवडयात आकाश पुर्णतः ढगाळ राहून जालना जिल्हयात हलका, औरंगबाद जिल्हयात मध्यम, बीड, उस्मानाबाद, लातुर व परभणी जिल्हयात जोरदार तर नांदेड व हिंगोली अती
जोरदार स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २४.० ते २९.० अंश सेल्सीअस राहील तर किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सीअस राहील. वारा
ताशी १२.० ते २१.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता
८७.० ते ९४.० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३.० ते ९१.० टक्के राहील.
विशेष सुचना : या आठवडयात आकाश पुर्णतः ढगाळ राहून जालना जिल्हयात हलका, औरंगबाद जिल्हयात मध्यम, बीड, उस्मानाबाद, लातुर व परभणी जिल्हयात
जोरदार तर नांदेड व हिंगोली अती जोरदार स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता आहे.
- खरीप ज्वारीचे पिकातील पावसाचे अतिरीक्त पाणी पीका बाहेर काढून देण्यात यावे. वापसा आल्यानंतर पिकात कोळपणी करून तणाचे नियंत्रण करावे. एक महिना झालेल्या खरीप ज्वारी पिकास ४० किलो नत्र हेक्टरी कोळपणीद्वारे देण्यात यावे.
- पावसाचे अतिरीक्त पाणी पिकाबाहेर काढून द्यावे. सोयाबीन पिकात पाने खाणा-या अळयाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी वापसा येताच क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यातुन फवारणी करावी.
- कापसाचे पिकातील पावसाचे अतिरीक्त पाणी पीका बाहेर काढून द्यावे. वापसा येताच जीरायत व बागायती कापूस पिकास उर्वरित दूसरी नत्र खताची मात्रा अनुक्रमे ४० व ६० किलो देण्यात यावी. रसशोषण करणा-या किडींच्या प्रादूर्भाव दिसून येत असल्यास वापसा येताच नियंणासाठी अॅसिफेट ७५ टक्के, २० ग्रॅम किंवा डायमिथोएट ३० टक्के, १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
- पावसाचे पाणी आळयातून बाहेर काढून द्यावे. पाऊस येताच मृगबाहार धरलेल्या शेतक-यांना संत्रा मोसंबी पिकास ५०० ग्रॅम युरीया प्रति झाड आळयातून द्यावा.
- मीरची, वांगे व टोमॅटोची पुनरलागवड वापसा येताच सरी वरंब्यांवर करावी.
- फुफुसाचा दाह होण्याची शक्यता आहे. निलगीरीचे तेलाचे दोन थेंब शेळया मेंढयाचे नाकात सोडावेत जनावरे कोरडया जागेत बांधावीत.
केंद्र प्रमुख
एकात्मिक
कृषि हवामान सल्ला सेवा योजना
पञक क्रमांकः २९
दिनांकः २३.०७.२०१३