वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी यांच्या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव
कार्यक्रमांतर्गत मौजे नांदगांव बु. ता. जि. परभणी येथे दिनांक 25 जुलै 2013 रोजी
सकाळी 09.00 वाजता खरीप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सहयोगी अधिष्ठाता व
प्राचार्य मा. डॉ. एन. डी. पवार हे उद्घघाटक म्हणुन तर
गावच्या सरपंच सौ. वत्सलाबाई बोबडे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख पाहुणे
म्हणुन लातुर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य
डॉ. बि. बी. भोसले, विभाग प्रमुख डॉ. बि. एम. ठोंबरे, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर.
पी. कदम, मौजे पांढरी येथील सरपंच श्री नारायणराव धस हे उपस्थित राहणार आहेत.
या
प्रसंगी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. सुर्यवंशी हे एकात्मिक रोग व्यवस्थापन,
डॉ.यु.एन.आळसे हे ऊस लागवड तंत्रज्ञान तर डॉ. ए. एस. जाधव हे तण व्यवस्थापनावर
मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यास परिसरातील जास्तीत जास्त शेतक-यांनी उपस्थित
राहण्याचे आवाहन डॉ. ए. एस. कडाळे व कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस. एस. शिंदे
यांनी केले आहे.