दि.1 जुलै 2013 रोजी वसंतराव नाईक यांची जयंती व कृषि
दिनानिमित्त मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालयाच्या अंतिम
वर्षातील कृषिकन्यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत बाभुळगांव
ता. जि. परभणी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमास कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. चौलवार व कार्यक्रम अधिकारी प्रा. सौ. सुनिता पवार, सरपंच सौ. कुंताबाई पारधे, उपसरपंच श्री पठाण, ग्रामसेवक श्री पवार, कृषि सहाय्यक श्री एस. बी. मुंडलीक व शाळेचे मुख्याध्यापक श्री सोनने व शेतकरीबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ एस बी चौलवार ह्यांनी वृक्षारोपनासोबतच कोरडवाहू
शेती पद्धती तर प्रा. सुनिता पवार ह्यांनी तण व्यवस्थापनावर शेतक-यांना
मार्गदर्शन केले.
ग्रामीण कृषि कार्यानुभवातर्गत विविध कार्यक्रम कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांच्या सूचनेनुसार आणि ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे कार्यक्रम समन्वयक तथा विस्तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बि. एम.
ठोंबरे व प्रभारी अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात येत आहेत.
सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु. स्वाती आमले, अनिता देशमुख, शितल
देशमुख, अलका ढवळे, आश्विनी गाडेकर, सत्यभाभा घाटूळ, प्रियंका चव्हाण, प्रियंका
कदम, सुरेखा कडेकर, शुभांगी कळंबे, वैशाली काळे, प्रियंका खटींग, ज्योती खुपसे,
आश्विनी कुबडे, मधुरा कुलकर्णी सरोजना पट्टेवाड, ज्योत्स्ना कुमारी, प्रितीमाला
यांनी परिश्रम घेतले.