Wednesday, July 10, 2013

मुरुंबा येथे कृषिकन्‍यांनी दाखवली जिवाणू संवर्धन व माती परिक्षनाचे प्रात्यक्षिके


मराठवाडा कृषि विद्यापीठातर्गत असलेल्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील कृषिकन्‍यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत मुरुंबा येथे सोयबीन बियाण्‍याला बुरशीनाशक व जिवाणू संवर्धीत प्रक्रियाचे तसेच माती परिक्षणासाठी मातीचा नमुना घेण्याचे प्रात्यक्षिकाचे आयोचन करण्यात आले होते. या कार्यक्रमास एकात्मिक पीक पध्‍दती संशोधन केंद्राचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. नारखेडे व कार्यक्रम अधिकारी डॉ. जयश्री एकाळे उपस्थित होत्‍या. डॉ. नारखेडे ह्यांनी बीजप्रक्रिया व माती परिक्षणाचे महत्‍व विषद केले मार्गदर्शन केले.
     बियाणे जिवाणू संवंर्धन प्रक्रिया व माती परिक्षण तसेच ग्रामीण कृषि कार्यानुभवाचे विविध कार्यक्रम सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांच्‍या सूचनेनुसार आणि विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख तथा समन्‍वयक डॉ. बि. एम. ठोंबरे व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम प्रभारी डॉ. राजेश कदम यांच्‍या मार्गदर्शनाने घेण्‍यात येत आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सरपंच श्री गोपीनाथ झाडे, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक व शेतकरीबांधव मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु. कोमल शिंदे, धनश्री हुडेकर, मंदा किरवले, मीना नाईकवाडे, स्‍नेहा गुंडला, प्रिया पवार, अश्विनी पंचांगे, कांचन क्षिरसागर, शितल लोनसने, पल्‍लवी पाटील, निशु खंदारे, सुवर्णा खंदारे, उजमा बेगम, ज्‍योती बोर्डे, प्रियंका खटींग, योगेश्‍वरी सोनटक्‍के व येळणे एस. एम. यांनी परिश्रम घेतले.