Thursday, July 25, 2013

किड व रोगाचे वेळीच नियंत्रण करा – डॉ. बी. बी. भोसले




     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी यांच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे नांदगांव बु. ता. जि. परभणी येथे खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रगतशील शेतकरी श्री माणिकराव जवंजाळ हे होते.  तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन लातुर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बि. बी. भोसले, विभाग प्रमुख डॉ. बि. एम. ठोंबरे, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. पी. कदम, ग्रामसेवक श्री संतोष जाधव, श्री हनुमान बोबडे, श्री बालासाहेब जवंजाळ, सखारामजी जवंजाळ, विठ्ठलराव जवंजाळ व  मौजे पांढरी येथील प्रगतशील शेतकरी श्री भुंजगराव धस, हे उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. बी. बी. भोसले यांनी कापुस व सोयाबीन या पिकांच्‍या एकात्मिक किड व्‍यवस्‍थापना बद्दल शेतक-यांना मार्गदर्शन केले. किड व रोगांचे शेतक-यांनी वेळीच नियंत्रण करावे म्‍हणजे कमी खर्चात प्रभावी किड नियंत्रण होईल असा सल्‍ला त्‍यांनी दिला. विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ डॉ. ए. पी. सुर्यवंशी यांनी एकात्मिक रोग व्‍यवस्‍थापन, डॉ.यु.एन.आळसे यांनी ऊस लागवड तंत्रज्ञान तर डॉ. ए. एस. जाधव यांनी तण व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. या वेळेस किडींचे ओळख पोस्‍टरच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांना दाखविण्‍यात आले. मेळाव्‍यास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
सुत्र संचलन श्री एस. बी. टाले यांनी तर आभार प्रदर्शन श्री एस.जी. वाकुडकर या विद्यार्थ्‍यांनी केले. मेळावा यशस्वितेसाठी जि. एन. पोटे, राजेश रंजन, आर. बी. रनेर, जि.एस. साबळे, एस.सी. सल्‍लावार, सुधीर कुमार, एम.एल. टाले, एस. एस. तेलंग्रे, विपुल कुमार, ए.एन. वडकुते, डि.ए. यादव, वाय. एस. चित्‍ता, व्हि. व्‍ही. झिरमिरे व आर. एस. भुक्तार आदिंनी परिश्रम घेतले.