वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत
असलेल्या एकात्मिक शेती पध्दती संशोधन प्रकल्पास शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता
डॉ विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर यांनी भेट देउन विविध प्रयोगांची व एकत्मिक शेती पध्दती प्रारूपाची पाहणी
केली. यावेळी मुख्य कृषिविद्यावेत्ता डॉ बा नि नारखेडे यांनी मान्यवरांना
माहीती दिली. याप्रसंगी तण नियंत्रण योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ अशोक जाधव, श्री
गि य सोनवणे, श्री समर्थ कारेगांवकर, श्री शेख एजाज, श्री शेख नुर, श्रीमती
मिनाक्षी बेंडे, श्री इमरान आदी उपस्थित होते.