शेतकरी मेळाव्यात
मार्गदर्शन करतांना कृषि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ विलास पाटील
|
प्रास्ताविक करतांना डॉ. बि. एम. ठोंबरे |
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत, असलेल्या परभणी येथील कृषि महाविद्यालय व सोयाबीन
संशोधन केंद्र यांच्या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदुतांनी
मौजे दामपुरी येथे रबी शेतकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक 25.09.2013 रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन गांवचे
सरपंच सौ. स्वाती बालासाहेब सुर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणुन कृषि महाविद्यालयचे
सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. विलास पाटील, सोयाबीन संशोधन केंद्राचे मुख्य
शास्त्रज्ञ डॉ. के. एस. बेग, ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्वयक तथा विस्तार
शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बि. एम. ठोंबरे, प्रभारी डॉ. आर. पी. कदम,
कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आर. नागरगोजे,
प्रा. डि. टी. पवार, गावचे पोलीस पाटील श्री अण्णासाहेब गमे व उपसरपंच
श्री माणिकराव गमे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बि. एम. ठोंबरे यांनी केली. कृषि महाविद्यालयचे प्रभारी प्राचार्य डॉ. विलास
पाटील म्हणाले कि, जमीनचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्यक
असुन रासायनिक खतांची संतुलीत वापर करावा. डॉ. अशोक जाधव यांनी तण व्यवस्थापन माहिती
दिली तर डॉ. डि. जी. मोरे यांनी खरीप व रबी हंगामातील येणा-या किडीबद्दल किटकनाशक
फवारतांना घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले तसेच डॉ संतोष पवार यांनी एकात्मिक
रोग व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. लोहगावातील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री
सखारामजी लोहगांवकर व श्री माणिकराव गमे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शेतक-यांचे प्रश्नोउत्तराच्या
माध्यमातून शेती विषयक शंकाचे समाधान शास्त्रज्ञांनी केले. यावेळी शेतकरी मोठया
संख्येने उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी उमेश चादर, विनायक राठोड,
साईनाथ तांबोळी, शेख आशिफ, श्रीकांत गोरे, बालाजी डाके, महेश देशमुख, विकास कदम,
राहुल कच्छवा, नागेश एंगडे, अमोल मोरे, देवानंद गायकवाड, मनिष मस्के, वैभस
सितापुरे, शेख शफीक, शेख मोईज, खातिब खालेद व विनायक राठोड कृषिदुतांनी परिश्रम
घेतले.