भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान
अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्ये पुढील आठवडयात आकाश ढगाळ राहून
तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २५.० ते ३३.० अंश सेल्सीअस राहील तर किमान तापमान २०.० ते २३.०
अंश सेल्सीअस राहील. वारा ताशी ३.० ते १७.० कि.मी. प्रति तास वेगाने पश्चिम व
पश्चिम-वायव्य दिशेने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६६.० ते ९५.० टक्के तर
दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२.० ते ८७.० टक्के राहील.
विशेष सुचना : या आठवडयात आकाश ढगाळ राहून तुरळक
ठिकाणी हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता आहे.
शेतकरी बांधवांना कृषि सल्ला
सोयाबीन
|
या आठवडयात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता
असल्यामुळे सोयाबीनची कापनी करू नये.
|
|
बाजरी
|
या आठवडयात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता
असल्यामुळे बाजरी पिकाची कापनी करू नये.
|
|
मुग,उडीद
|
मुग व
उडीदाची काढणी केलेल्या जमीनीत वापसा येताच वखरणी करून रब्बी पेरणीसाठी जमीन
तयार करून घ्यावी.
|
|
तीळ,कारळ
|
जमिनीत
वापसा येईपर्यंत तीळ कारळाची कापनी करू नये. मागील आठवडयात कापनी केलेले पीक
जमिनीवर उभे करून ठेवावे.
|
|
हळद,आले
|
हळदीचे
व आले पिकातील अतिरिक्त पाणी पीका बाहेर काढून द्यावे.
|
|
केळी
|
केळीचे
बागेतील पावसाचे पाणी बाहेर काढून द्यावे. केळीच्या बागेतील पाण्याच्या
निच-यासाठी उताराच्या अडव्या बाजुने बागे बाहेरून चर घ्यावेत.
|
|
डाळिंब
|
बागेतील
पावसाचे पाणी बाहेर काढून द्यावे. फळावरील ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी बागेत
वापसा येताच कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन
फवारणी करावी.
|
|
आंबा
|
पावसाचे
पाणी बागेत साचुन रहाणार नाही याची काळजी घ्यावी. आंबेबहाराच्या फळकाडयावरील
नवीन येणारी फुट काढून टाकावी.
|
|
बोर
|
बोरीच्या
झाडावर पाने खाणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासठी
फेन्वलरेट २० टक्के ५ मिली किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १६ मिली प्रति १० लिटर
पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
|
|
भाजीपाला़
|
कोबीवर्गीय
भाजीपाला पिकात पानेखाणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्याच्या
नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन
फवारणी करावी. रांगडा कांदा लागवडीसाठी वापसा येताच गादीवाफयावर बियाण्याची
पेरणी करावी. लसुन लागवडीसाठी वापसा येताच जमीन तयार करून घ्यावी.
|
पशुधन व्यवस्थापन : जनावरांमध्ये सद्या गोचीडांचा प्रादूर्भाव
दिसून येत आहे.
त्याच्या नियंत्रणासाठी ब्युटॉक्स १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून जनावरांचे अंगावर फवारणी करावी. शेळया मेंढयामध्ये सर्दीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास नाकात निलगीरीच्या तेलाचा १ थेंब सोडावा. |
सौजन्य
केंद्र प्रमुख
एकात्मिक
कृषि हवामान सल्ला
सेवा योजना
हवामानशास्त्र
विभाग, वनामकृवि, परभणी
पञक क्रमांकः ४५
दिनांकः २०.०९.२०१३