वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठांतर्गत गृहविज्ञान विद्याशाखा इ. स. 1976 पासुन परभणी जिल्ह्यातील
विविध खेड्यातून ज्ञान प्रबोधनाचे कार्य करत आहे. गृहविज्ञान विद्याशाखेत
विद्यार्थ्यांना दिले जाणा-या विविध विषयाचे ज्ञान हे प्रत्येक कुटुंबाला, व्यक्तीला
आवश्यक आणि सहजपणे अवलंब करता येण्यासारखे आहे, जेणेकरुन ग्रामीण कुटुंबांना त्यांचे
जीवनमान तसेच राहणीमान उंचावण्यास मदत होते. असे हे गृहविज्ञान शाखेचे
मराठवाड्यातील जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुटूंबाला मिळावे अश्या हेतुने ‘गृहविज्ञान
आपल्या दारी: कुटुंबाचे कल्याण करी’ या अभिनव अभियानाची कल्पना गृहविज्ञान
विद्याशाखेच्या वतीने ग्रामीण कुटूंबांना गृहविज्ञानाचा अधिकाधिक फायदा व्हावा
म्हणून नोव्हेंबर महिन्याच्या 23 तारखेपासून हे अभियानाचे उदघाटन दिल्ली येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या नॅनो
तज्ञा डॉ रत्नमाला चॅटर्जी , शिक्षण संचालक डॉ विश्वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर, कुलसचिव श्री का वि पागीरे, गृहविज्ञान
महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि
महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ बी व्ही आसेवार यांच्या
प्रमुख उपस्थिती दि 22 नोव्हेबर रोजी झाले. या अभियानांतर्गत प्रत्येक
शनिवारी गृहविज्ञान तज्ञ, संशोधन सहयोगी, इतर स्थानिक तज्ञ यांचे दोन चमु दोन
खेड्यात जाउन विविध विषयावर व्याख्याने, प्रात्यक्षिके, व्हिडीओ फिल्म आणि
प्रदर्शनी यांच्या सहाय्याने तज्ञ प्रबोधन करतील. वातावरण् निर्मितीसाठी इलेक्ट्रानिक
माध्यमातुन ग्रामीण जीवनाचा दर्जा उंचावण्याशी सुसंगत घोषवाक्याचा गजर संपूर्ण
गावभरात केला जाणार आहे. यात पुढील विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
1. घ्या गृहविज्ञानाचे शिक्षण विकासाचे वरदानी
दालन.
2. स्त्रियांचे दरहजारी घटणारे प्रमाण : सामाजिक
स्थैर्यावरील मोठे संकट
3. सक्षम गृहिणी - आवश्यक खबरदारी आणि जबाबदारी
4. स्वस्थ कौटुंबिक संबंध - स्वस्थ मानसीक आरोग्य
5. महाभारत दर्शन - कौटुंबिक कल्याण दर्पण
6. दर्जेदार बाल शिक्षण - पाल्याच्या उज्वल
भविष्याची गुरुकिल्ली
7. किशोरवयीन मुल्यांचे स्वयंकाळजी – पाल्य
पालकांतील संघर्षाचे समायोजन
8. चांगले पोषण चांगले आरोग्य – हीच खरी
कौटुंबिक बचत / दौलत
9. कौटुंबिक उत्पनास लावण्या हातभार – गृहिणींनो
करा लघु उद्योगाचा स्विकार
10. पर्यावरणा विषयक आव्हाने : कुटुंबाची जबाबदारी
तसेच कार्यक्रमाच्या शेवटी तज्ञांनी केलेल्या प्रबोधनावर आधारीत 10
प्रश्न विचारले जातील सर्व प्रश्नांची अचुक उत्तरे देण्याच्या सहभागी व्यक्तीस
‘उत्कृष्ट
श्रवण पुरस्कार’ देण्यात येईल.