नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषद यांचा
तर्फे दिला जाणारा इंदिरा गांधी सदभावना पुरस्कार यंदा वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठात कार्यरत असलेले डॉ. राजेश परभतराव कदम यांना दि ०३.०४.२०१४ रोजी
नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे ह्या
पुरस्कारांचे स्वरूप असुन कृषी शिक्षण व विस्तार कार्यात भरीव कामगिरीबाबत तसेच
ग्रामीण विकासात युवकांच्या योगदानाबाबतचे मार्गदर्शनाबाबत डॉ राजेश कदम यांना हा
पुरस्कार देण्यात आला. त्यांनी विविध शेतकरी मेळावे, गटचर्चा, प्रदर्शन,
प्रक्षेत्र भेटी इत्यादी माध्यमातून नवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतक-यांचा
विकास होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. गरजेवर आधारित नाविन्यपूर्ण संशोधन करून
त्याचा फायदा शेतक-यांना व्हावा व शेतक-यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न
केले. सदरील कामाचे दखल घेऊन नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदचे अध्यक्ष
जेष्ठ विधिज्ञ श्री तुली, महासचिव डॉ. एन. एस. एन. बाबू आदीचा समावेश असलेल्या समितीने डॉ. प्रा. राजेश कदम यांची
इंदिरा गांधी सदभावना पुरस्कारासाठी निवड केली. नवी दिल्ली
येथे एका भव्य कार्यक्रमात तामिळनाडूचे माजी राज्यपाल तथा पूर्वोत्तर राज्य मा. श्री. भिष्मनारायण सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान
करण्यात आला, त्याप्रसंगी माजी मुख्य निवडणूक आयुक्त मा. श्री. जी. व्ही. जी.
कृष्णामूर्ती, पंजाबचे माजी राज्यपाल तथा सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य
सरन्यायाधीश मा. श्री. ओ. पी. वर्मा, जेष्ठ विधिज्ञ मा. श्री. ओ. पी. सक्सेना, आंतरराष्ट्रीय
व्यवसाय परिषदचे अध्यक्ष तथा जेष्ठ विधिज्ञ श्री तुली, महासचिव डॉ. एन. एस. एन.
बाबू आदींच्या प्रमुख उपस्थित होती. या पुरस्काराबाबत डॉ. प्रा. राजेश कदम यांचे विद्यापीठाचे
अधिकारी व कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले आहे.