मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ अशोक ढवण |
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्या कृषि महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. अशोक
ढवण होते तर ग्रामीण कथाकथनकार राजेंद्र गहाळ, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, विभाग प्रमुख डॉ. बी.एम.ठोंबरे यांची
प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता
(कृषी) डॉ.अशोक ढवण म्हणाले की, राष्ट्रीय सेवा
योजना ही विद्यार्थ्यांना सुजान नागरिक घडवण्याचे माध्यम असुन समाजातील विविध प्रश्नाची
जाण यामुळे आजच्या युवकात निर्माण होते, तरूण वर्गाने समाजातील विविध समस्याचे
निराकरणाचे कार्य हाती द्यावे असे आवाहन त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना केले.
ग्रामीण कथाकथनकार राजेंद्र गहाळ यांनी आईवडीलांचे उपकार आपण कधीही फेडु शकत नाही, त्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे, असा सल्ला त्यांनी दिला. महात्मा गांधीचे कार्या पासुन प्रेरणा घेऊन स्वंयसेवकांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने आपला व्यक्तिमत्व विकास साधावा, असा सल्ला कृषि
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांनी दिला
तर डॉ. बी.एम.ठोंबरे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजना हि एक चळवळ
असून ती आयुष्यभर सर्व स्वंयसेवकानी अंगीकृत करावी असे सांगितले.
प्रा.व्ही.बी.जाधव व स्वंयसेवक विशाल
राठोड, मनीषा दहे, तुकाराम मंत्रे, जीवन धोत्रे, वृषाली खाकाळ, जान्हवी जोशी यांनी
राष्ट्रीय सेवा योजनेवर आपले विचार मांडले. याप्रसंगी प्रा. रवींद्र
शिंदे यांना राज्यस्तरीय सन २०१३-१४ चा ‘उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी’ पुरस्कार मिळाल्याबद्दल
डॉ.अशोक ढवण यांच्या हस्ते सत्कार कण्यात आला. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.एम.कांबळे यांनी केले तर आभारप्रदर्शन कार्यक्रम
अधिकारी प्रा.रवींद्र शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रियांका खर्चे व नितीन
डोकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वंयसेवक संजय चिंचणे, कुमार पानझडे,
भारत खेल्भाडे, मारोती चातुरे, विनिता वर्मा, संजीवनी बारंगुले, संध्या थोरात,
नेहा भोल, शारदा घोलप, अनुराधा बुचाले,सय्यद रिजवाना,पूजा शेटे, शिताराम बाद्से,मयुरी
काळे, विश्वास कदम,अजय मुंढे, आणि राजेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले.