परभणी : मागील काही
दिवसांपासुन राज्यात तसेच मराठवाडयातील काही भागात बेमोसमी पाऊस पडला आहे. ज्या भागात
जमिनीतील ओलाव्यात वाढ झाली, त्याभागात रब्बी हंगामातील गहु, करडई व हरभरा पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
करडई हे पीक कमी पाण्यावर तसेच जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर घेऊन सद्यस्थितीत
पडणा-या अवकाळी पावसाचा करडई पीकाला फायदा होऊ शकतो. परभणी येथील वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाने प्रसारित केलेल्या करडईच्या परभणी-१२ (परभणी
कुसुम)
व परभणी-४० या वाणांचा उशिरा पेरणीसाठी वापर करता येतो. वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाकडे परभणी-१२ या करडईच्या सुधारित
वाणाचे बियाणे उपलब्ध असुन शेतकरी बांधवांनी सदरिल वाणाची पेरणी करावी व पडलेल्या
पावसाचा फायदा घ्यावा, असे आवाहन संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी केले
आहे. परभणी-१२ या करडईच्या वाणाची सत्यतादर्शक बियाणाच्या पाच किलो वजनाच्या पिशवीची
किंमत ३७५ रूपये आहे.
तसेच हरभरा पीकाचे आकाश व विजय या वाणाचे व गहु
पिकात लोकवन वाणाचे बियाणे विद्यापीठाकडे विक्रीसाठी उपलब्ध
आहे. बियाणे खरेदीसाठी बीजोत्पादन अधिकारी डॉ एस बी घुगे
(९४२१४६०१४३) यांच्याशी संपर्क
करावा.