‘मराठवाड्यातील पशुधन व दुग्ध व्यवसाय : दिशा व आशा’ या विषयावर एक दिवशीय
प्रशिक्षण संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार
शिक्षण संचालनालय व कृषि महाविद्यालयाचे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग यांच्या
संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत ‘मराठवाड्यातील पशुधन व दुग्ध
व्यवसाय : दिशा व आशा’ या विषयावर शेतकरी पशुपालक व कृषी विस्तारक यांचे एक दिवशीय प्रशिक्षण
कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २९ मार्च रोजी करण्यात आले होते. प्रशिक्षण
कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांच्या हस्ते संपन्न
झाले तर कार्यक्रमास संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवण, संचालक विस्तार शिक्षण डॉ.
बाळासाहेब भोसले व प्रभारी प्राचार्य डॉ. गिरीधर वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती
होती.
कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू
अध्यक्षीय भाषणात महणाले की, ज्या शेतक-यांकडे शेती पुरक जोड व्यवसाय आहे, ते
निश्चितच दुष्काळी परिस्थितीत काही प्रमाणात तग धरून आहेत. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
या कृषि पुरक व्यवसायातुन शेतक-यांत आर्थिक स्वावलंबन शक्य होईल, अशी आशा त्यांनी
यावेळी व्यक्त केली. शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी शेतकरी पशुपालकांना
दर्जेदार पशुपालन जोपासण्याचे आवाहन केले तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले
म्हणाले की, शेतक-यांनी खचुन न जाता शेतीशी निगडीत असलेला पशुसंवर्धन व्यवसाय
करुन शेतीला आर्थिक पाठबळ द्यावे.
प्रशिक्षण कार्यक्रमासाठी
मराठवाड्यातुन ७० शेतकरी पशुपालकासह कृषि विभागातील दहा अधिकारी-कर्मचारी उपस्थित
होते. प्रशिक्षणात पशु अनुवंश सुधारणा, पशु प्रजनन, पशु आहार, व्यवस्थापन व पशु
आरोग्य या विषयावर डॉ. अनिल भिकाणे, डॉ. भास्कर बोरगांवकर, डॉ. श्रीधर शिंदे व
डॉ. नितीन मार्कण्डे, डॉ. विनायकराव कल्लुरकर व डॉ. महादेव पाचेगांवकर यांनी
मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे
यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. अनंत शिंदे तर आभार प्रदर्शन डॉ. शंकर नरवाडे यांनी
केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. दत्ता बैनवाड, प्रा. नरेंद्र कांबळे, श्री
प्रभाकर भोसले, श्री माधव मस्के, श्री नामदेव डाळ आदीसह पदव्युत्तर व आचार्य
पदवीचे विद्यार्थीनी परिश्रम घेतले.