Friday, July 1, 2016

गृहविज्ञान महाविद्यालयात कृषि दिनानिमित्त वृक्षारोपण













वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजना व जिमखाना यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्‍यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचया जयंती निमित्‍त कृषि दिनाचे औजित्‍य साधुन महाविद्यालयाच्‍या परिसरामध्‍ये वृक्षरोपण करण्‍यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते रासेयोच्‍या स्‍वयंसेवकांना रोपांचे वाटप करून करण्‍यात आला. याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्या प्रा विशाला पटनम, प्राचार्य डॉ डि एन गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर आदीसह महाविद्यालयाचे प्राध्‍यापक, कर्मचारी, रासेयोचे स्‍वयंसेवक, पदवी व पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाचे विद्यार्थ्‍यी यांनी करंज, कडुलिंब आदीं 125 रोपांची लागवड केली. कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य प्रा विशाला पटनम व आयोजन रासेयोच्‍या कार्यक्रमाधिकारी प्रा. निता गायकवाड, रासेयोचे स्‍वयंसेवक व उद्यान कर्मचारी यांनी केले होते.