वनामकृविच्या
कृषि महाविद्यालयात स्पर्धापरिक्षेबाबत माजी विद्यार्थ्यांचे
मार्गदर्शन
वसंतराव
नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठातील
परभणी
कृषि महाविद्यालयाच्या
राष्ट्रीय छात्रसेनेच्या
वतीने स्वातंत्र्यदिनाचे
औजित्यसाधुन दिनांक १५ ऑगस्ट
रोजी स्पर्धा परिक्षेबाबत
मार्गदर्शन कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू
मा.
डॉ.
बी.
व्यंकटेश्वरलु
हे होते तर व्यासपीठावर
प्राचार्य डॉ डि एन गोखले,
महाविद्यालयाचे
माजी विद्यार्थी तथा भारतीय
सैन्यदलातील कॅप्टन श्री.
बालाजी
सुर्यवंशी तसेच पोलिस उपनिरिक्षक
श्री अरूण डोंबे,
विभाग
प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे,
प्रभारी
अधिकारी डॉ एच व्ही काळपांडे,
छात्र सेना अधिकारी प्रा आशिष बागडे यांची
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी
महाविद्यालयाचे
माजी विद्यार्थी तथा भारतीय
सैन्यदलातील कॅप्टन श्री.
बालाजी
सुर्यवंशी व पोलिस उपनिरिक्षक
श्री अरूण डोंबे यांनी
स्पर्धापरिक्षेत यश संपादन
करण्यासाठी मार्गदर्शन
केले.
कॅ.
बालाजी
सुर्यवंशी आपल्या मार्गदर्शनात
म्हणाले की,
कोणतीही
भाषा ही ज्ञान वाढविण्याचे
माध्यम असुन कृषिच्या विद्यार्थ्यानी
इंग्लीश भाषेचा न्युनगंड
न बाळगता स्पर्धेापरिक्षेची
तयारी करावी. स्पर्धापरिक्षेत यश संपादन करण्यासाठी
विद्यार्थ्यांनी
वाचनाची सवय ठेवावी,
वाचनास
प्रत्यक्ष अनुभवाची जोड
द्यावी,
त्यातुन
विचार करण्याची क्षमता विकसित
होऊन विचार प्रगल्भ होतात.
पोलिस
उपनिरिक्षक श्री.
अरूण
डोंबे आपल्या भाषणात म्हणाले
की,
विद्यार्थ्यानी आपले ध्येय महाविद्यालयीन
जीवनात निश्चित करून प्रामाणिक
प्रयत्न केल्यास निश्चितच
यश प्राप्त होते.
अध्यक्षीय
भाषणात कुलगुरू मा.
डॉ.
बी.
व्यंकटेश्वरलु
म्हणाले की,
कृषि
पदवीधरांना विविध क्षेत्रात मोठया संधी उपलब्ध आहे.
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे
विद्यार्थ्यी देशापातळी व
राज्यात विविध क्षेत्रात
मोठया प्रमाणाात कार्यरत असुन
त्याचा रास्त अभिमान
विद्यापीठास आहे.
कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन संदिप खरबळ यांनी
केले तर आभार अनिकेत भद्रे
यांनी मानले.
कार्यक्रमात देशभक्तिपर गीताचे तेजस्विनी बेद्रे हिने सादरिकरण केले.
कार्यक्रमास
महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद
व विद्यार्थ्यी-विद्यार्थ्यीनी
मोठया संख्येने उपस्थित
होते.
मार्गदर्शन करतांना कॅप्टन श्री बालाजी सुर्यवंशी |
मार्गदर्शन करतांना पोलिस उपनिरिक्षक श्री अरूण डोंबे |