परभणी
कृषी महाविद्यालयात आयोजीत गणेशोत्सवाच्या व्याख्यनमालेचे गुंफले तिसरे पुष्प
विद्यार्थ्यांनी
आई, वडील, शिक्षक व मातीस विसरू नये, यांच्या मुळेच माणसे मोठी होतात. आई-वडीलांच्या
अपेक्षा पुर्ण करा, आयुष्यात माणुसकी जपली पाहिजे, असा सल्ला पोलिस निरिक्षक
श्री. अशोक घोरबांड यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत
असलेल्या परभणी येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त
विविध विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते, दिनांक १४ सप्टेबर
रोजी या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफतांना पोलिस निरीक्षक श्री. अशोक
घोरबांड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले
होते तर विभाग प्रमुख डॉ. आर. डी. आहीरे, डॉ. ए. एस. कार्ले, गणेशोत्सव समिती अध्यक्ष
प्रविण पोपळघट, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पोलिस
निरिक्षक श्री. अशोक घोरबांड मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की, स्पर्धेपरिक्षेचा
अभ्यास करतांना नियोजन करा, अभ्यासात स्वत: ला पुर्णपणे झोकुण द्या, यश तुम्हचेच
आहे. अपयशाने खचु नका, पुन्हा उभे रहा. घामाला सुगंध असतो, मेहनत करा. आज
ज्ञानाची अनेक दालने खुली आहेत, त्यांचा वापर करा. महाविद्यालयीन जीवनात रॅगींग,
भांडणे, दारूचे व्यसन आदीपासुन दुर रहा. युवकांत मोठे सामर्थ्य असते, त्याचा
योग्य वापर करा. विद्यार्थ्यांत नम्रता असली पाहिजे. शेतकरी हा शेतीचा पुजारी
असुन देशाचा अन्नदाता आहे, कृषीच्या विद्यार्थ्यांना त्यांची सेवा करण्याची
संधी आहे.
अध्यक्षीय
समारोपात प्राचार्य डॉ. डि एन गोखले म्हणाले की, समाजाचा पोलिसांबाबतचा दृष्टीकोन
बदलत असुन पोलिस सर्वसामान्यांना आपला वाटला पाहिजे. कार्यक्रमात मीरा आवरगंड
हिनेही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केदार बारोळे यांनी
केले. सुत्रसंचालन वैभव बदोले यांनी केले तर आभार प्रदिप थोरवे यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया संख्येने
उपस्थित होते.