वनामकृविचा महिला व्हॉलीबॉल संघ उपांत्य फेरीत दाखल
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे चालु असलेल्या 20 व्या महाराष्ट्र राज्य आंतर
विद्यापीठ क्रीडा महोत्सवात व्हॉलीबॉल मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ, परभणी विरुध्द संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती यांच्यामध्ये
साखळी फेरीतील उपांत्यपुर्व चुरसीच्या लढतीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यपीठाने बाजी मारली व उपांत्य फेरी गाठली. चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत 25 –
16, 18 – 25 व 15 – 07 अशा तीन सेटमध्ये विजय संपादन करून आंतर विद्यापीठ क्रीडा
महोत्सव स्पर्धेच्या इतिहासामध्ये प्रथमच वनामकृविच्या महिला हॉलीबॉल संघानी नेत्रदिपक
कामगीरी केली. या संघामध्ये कर्णधार शारदा चोपडे हिच्या नेतृत्वाखाली संजीवनी
बारंगुळे, अपर्णा उजगीरे, प्राजक्ता चौगुले, जयश्री भालेराव, अश्लेषा क्षिरसागर,
प्रतिक्षा पवार, रजनी टकले, शितल पतंगे, विशाखा चोपडे, गीतांजली फोपसे यांचा
समावेश होता. सदरिल संघ यशस्वीतेसाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख
यांच्या मार्गदर्शनाखाली संघ व्यवस्थापक डॉ. आशा संजय देशमुख, प्रशिक्षक सतिष
चिमन्ना, सहाय्यक प्रशिक्षक राम खोबे, विजयकुमार काळे, विजय सावंत, डॉ. जयकुमार
देशमुख, प्रा. गजानन गडदे, डॉ. सचिन मोरे, श्री जी. बी. उबाळे, किशोर शिंदे,
प्रदिप जंपनगीरे, चंद्रमोहन यादव, प्रमोद राजगुरु, सुनिल खटींग, दिपक गोरे, के.
डी. शेषणे, पठाण, निखील बचेलवार, किशन सुर्यवंशी आदिंनी परिश्रम घेतले.