नांदेड जिल्हातील माळेगांव येथे दिनांक २७ ते ३१
डिसेंबर दरम्यान खंडोबा यात्रेनिमित्त कृषि व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात
आले होते. सदरिल प्रदर्शनात कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्रे, कृषि विभाग व
विविध कंपन्याचे सुमारे शंभर दालनाचा समावेश होता. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, मुख्य विस्तार शिक्षण
अधिकारी डॉ पी आर देशमुख, विस्तार शिक्षण अधिकारी प्रा. पी एस चव्हाण यांच्या
मार्गदर्शनाखाली विद्यापीठ विकसित विविध पिकांची वाणे, तंत्रज्ञान व जीवंन नमुने
आदीचा समावेश असलेल्या विद्यापीठाच्या दालन मांडण्यात आले होते. विद्यापीठाच्या
सदरिल दालनास प्रदर्शनाचे व्दितीय क्रमांकाचे उत्कृष्ट दालन म्हणुन प्रशस्तीपत्र
देण्यात आले. विद्यापीठाच्या वतीने श्री वैजनाथ सातपुते यांनी प्रशस्तीपत्र स्वीकारले.
प्रदर्शनात वैजनाथ सातपुते, कौसडीकर, घाडगे यांनी शेतक-यांना व मान्यवरांना विद्यापीठ
तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली तर साखरे यांनी प्रदर्शनात सहकार्य केले. वनामकृविच्या
दालनास नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. श्रीमती गुंडले, आमदार मा. श्री.
प्रतापराव चिखलीकर, जि प उपाध्यक्ष मा. श्री दिलीप धोंडगे, नांदेडचे जिल्हाधिकारी
श्री. सुरेश काकानी, माजी आमदार श्री. शंकरअण्णा धोंडगे आदी मान्यवरांसह शेतकरी,
महिला शेतकरी, विद्यार्थ्यी यांनी मोठया संख्येने भेटी देऊन विद्यापीठाच्या वाणांची
व तंत्रज्ञानाची माहिती घेतली, विशेषत: सोयाबीनचे एमएयुएस-१६२ व तुरीचे बीडीएन-७११
हे वाण आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरली. सदरिल पारितोषिकाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू
मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांनी अभिनंदन केले.