परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन
अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना
कार्यक्रमांतर्गत दिनांक ३१ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी
जनजागृती व स्वच्छतेचे
महत्व पटवून देण्यासाठी स्वच्छतेसंबंधी अॅपच्या कार्यप्रणालीचे प्रशिक्षण संपन्न
झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक कडाळे हे होते तर परभाण्ी
शहर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती श्रीमती विजया घाडगे यांची प्रमुख
उपस्थिती होती. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थी व कर्मचारी यांना शहरांच्या स्वच्छता
अभियानात सहभाग नोंदवावा असा सल्ला अध्यक्षीय समारोपा प्राचार्य डॉ. अशोक कडाळे यांनी
दिला तर सहाय्यक आयुक्त श्रीमती श्रीमती विजया घाडगे यांनी आपल्या भाषणात स्वच्छता
अॅप डाऊनलोड करुन स्वच्छ सर्वेक्षण २०१७ शहराच्या स्वच्छता सेवेत योगदान देण्याचे
आवाहन केले. सदरील अॅप केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाने विकसित केलेले आहे. या अॅपच्या
सविस्तर कार्यप्रणाली विषयी शेख अर्शद यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छतेविषयक
काहीही समस्या असली तरी स्वच्छता अॅप त्याचे निराकरण करण्यास मदत करेल असेही
त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. रवींद्र शिंदे व कार्यक्रमाधिकारी
संजय पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या
यशस्वितेसाठी स्वयंसेविका कल्पना भोसले,
विकास सांगळे, विश्वजित थोरात आदि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास
विभाग प्रमुख प्रा. भास्कर भुइभार, प्रा. विवेकानंद भोसले, प्रा. स्मिता सोलंकी,
प्रा. सुमंत जाधव, प्रा. सुहास जाधव, प्रा. हरीश आवारी, प्रा. सुभाष विखे,
प्रा.श्याम गरुड, अमृत उबाळे आदीसह विद्यार्थ्यी व कर्मचारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.