तोंडापुर (ता.
कळमनुरी जि. हिंगोली) येथील
कृषि विज्ञान केंद्रात आयोजित वनामकृविच्या महिला शेतकरी मेळाव्यास मोठा
प्रतिसाद
महिला शेतकरी मेळाव्याचे उदघाटन करतांना मान्यवर |
कृषि प्रदर्शनाचे उदघाटन करतांना मान्यवर |
सावित्रीबाई फुले यांचे चरित्र अभ्यासुन त्या
मार्गाने जाणे आज आवश्यक आहे,
देश महासत्ता होण्यासाठी महिलांचा विकास आवश्यक आहे. महिलांनी स्वत: वरील विश्वास
वाढवावा, स्वयंसिध्द व्हावे, असे प्रतिपादन कोल्हापुर येथील स्वयंसिध्दा संस्थेच्या
अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या मा. कांचनताई परूळेकर यांनी केले. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय, हिंगोली येथील कृषि
विज्ञान केंद्र व महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग, हिंगोली यांचे संयुक्त विद्यमाने
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दिनांक ३ जानेवारी रोजी तोंडापुर (ता.
कळमनुरी जि. हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्रात आयोजित
महिला शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी
त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
हे होते तर विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. रामराव वडकुते, मुख्य कार्यकारी
अधिकारी मा. डॉ. एच. पी. तुम्मोड, हिगोंली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा. श्री.
राजेश्वर पतंगे, माजी खासदार अॅड. शिवाजीराव माने, विस्तार शिक्षण संचालक डॉ.
बी. बी. भोसले, प्राचार्या प्रा विशाला पटनम, प्राचार्य डॉ पी एन सत्वधर, नाबार्डचे
श्री प्रितम जंगम, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, वरिष्ठ
शास्त्रज्ञ डॉ पी पी शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक कार्यकर्त्या मा. कांचनताई परूळेकर
पुढे म्हणाल्या की, महिला आर्थिक व राजकीय साक्षर झाल्या पाहिजेत. शिक्षण व
शेतीची सांगड घातली पाहिजे. महिला बचतगटांनी कर्जाचा उत्पादक कामासाठी उपयोग
करावा. महिला बचत गट हे विकासाचे व्यासपीठ व्हावे. महिला बचत गटांनी गटशेती,
कंत्राटी शेती करावी. महिलांनी चौकटी बाहेर पडुन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब
करावा. रोज नवनवीन शिक्षण घ्या. महिलांनी घर सांभाळुन एकमेकींना प्रोत्साहन देत
रोपवाटीका, जीवाणु खत व गांडुळ खत निर्मिती, फळ प्रक्रिया उद्योग, कुटिर उद्योग
करावेत. आज सर्वांना नौकरी मिळणे दुरापास्त आहे, शेती व शेतीपुरक व्यवसायात
उतरावे लागेल. आज पिकविता येते पण विकता येत नाही अशी गत झाली आहे, विक्री कौशल्य
महिलांनी शिकावे. महिलांनी एकतरी हस्तकला जोपासवी. महिलांनी शेती, माती व ज्ञान
संस्कृती जपावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
यांनी राज्यातील महिला बचत गटात मराठवाडयातील महिला बचत गट सर्वांत सक्रिय असुन
या बचत गटांना तांत्रिक, आर्थिक व बाजारपेठेबाबत प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठ पुढाकार
घेईन. शेतकरी बियाणे कंपन्या व महिला बचत गटांचा माल विक्रीसाठी थेट विक्रते ते
ग्राहक यांच्यात एक व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी विद्यापीठ उपक्रम घेईन, असे आश्वासन
दिले.
आमदार मा. श्री रामराव वडकुते आपल्या भाषणात
म्हणाले की, महिलांना आपल्या शक्तीची जाणीव झाली पाहिजे, समाज परिवर्तनासाठी
महिलांनाच पुढाकार घ्यावा लागेल. माजी खासदार मा. अॅड. शिवाजी माने आपल्या
भाषणात म्हणाले की, शेती विषयक निर्णय प्रक्रियेत महिलाचा सहभाग वाढवावा लागेल,
महिला जोपर्यंत पुरूषांच्या खांद्यालाखांदा लावुन समाजात उभ्या राहणार नाहित
तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री राजेश्वर
पतंगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी.
बी. भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव व विजय ठाकरे
यांनी केले तर आभार प्रदर्शन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ पी पी शेळके यांनी केले. मेळाव्याच्या
तांत्रिक सत्रात शेतकरी महिलाचे काबाटकष्ट कमी करणारे तंत्रज्ञान, अन्न व
फळप्रक्रिया तंत्रज्ञान, बालकांचा विकास आदी विषयांवर विद्यापीठ शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन
केले तसेच नाबार्डच्या वतीने कॅशलेस प्रणालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात
विद्यापीठाच्या शेतीभातीच्या महिला विशेषांकाचे व विद्यापीठ शास्त्रज्ञ लिखित
विविध पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दाळ प्रक्रिया उद्योग
करणा-या ग्रामीण महिला उद्योजिका सुलोजना नरवाडे यांच्या यशोगाथावर आधारीत
आम्रपाली या लघुपटाचे विमोचन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कृषि
प्रदर्शनास शेतकरी महिलांनी मोठया प्रतिसाद दिला तर मेळाव्यास मोठया संख्येने शेतकरी
महिला उपस्थित होत्या.
मार्गदर्शन
करतांना सामाजिक
कार्यकर्त्या मा. कांचनताई परूळेकर
|
मार्गदर्शन करतांना विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. रामराव वडकुते |
अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु |
मार्गदर्शन करतांना माजी खासदार अॅड.
शिवाजीराव माने
|
प्रास्ताविक करतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले |