Saturday, April 29, 2017

गृहविज्ञान महाविद्यालयात बालविकासावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयात बालकांच्‍या विकासात शाळांची भुमिका यावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 28 एप्रिल रोजी करण्‍यात आले होते. यात सेवांतर्गत 41 शिक्षकांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य तथा बालविकास तज्ञा प्रा विशाला पटनम यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले होते. यावेळी त्‍यांनी बालकांच्‍या सर्वांगिण विकासाचे विविध घटक, बालविकासासा‍ठी पोषक वातावरण निर्मितीमध्‍ये शिक्षकांची भुमिका, शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या वर्तन समस्‍यांचे निराकरण व काळजी या विषयावर प्रात्‍यक्षिकासह मार्गदर्शन केले. कार्यशाळेत प्राप्‍त शास्‍त्रोक्‍त बालविकासा संबंधीच्‍या माहिती आधारे शिक्षकांनी विद्यार्थ्‍यांचा सर्वांगिण विकास घडविण्‍याकरिता वातावरण निर्मिती करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन प्रा़. विशाला पटणम यांनी केले. कार्यशाळेवर आधारीत प्रश्‍न मंजुषा घेण्‍यात येऊन विजेत्‍यांना स्‍टार अॅवार्डस प्रदान करण्‍यात आले.