वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय व कृषी महाविद्यालय
परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे जांब (ता.जि. परभणी) येथे आयोजित करण्यात आले होते. सदरिल शिबिरात विविध वनौषधी रोपांचे वाटप गावातील जिल्हा
परिषदेच्या परिसरात लागवडी करीता वाटप करण्यात आले. तसेच परिसर स्वच्छता मोहिम
राबविण्यात आली. यावेळी शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. रामप्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले,
प्राचार्य डॉ. अशोक कडाळे, प्रभारी कार्यक्रम समन्वयक प्रा. गणेशराव
गुळभिले, सरपंच श्री. संजयराव स्वामी, उपसरपंच श्री. अजयराव जामकर, मुख्याध्यापिका
श्रीमती प्रतिमा वाव्हळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनात
डॉ. रामप्रसाद देशमुख यांनी आदर्श मानवी जीवनमुल्यांची मांडणी केली. प्राचार्य
डॉ. धर्मराज गोखले व डॉ. अशोक कडाळे यांनी वैयक्तीक स्वच्छतेचे महत्व सांगुन वैयक्तीक
स्वच्छता व परीसर स्वच्छता ही मानवाच्या आरोग्याच्या द़ष्टिीने महत्वाची
बाब असुन सामाजिक बांधिलकी म्हणुन स्वयंसेवकांनी याचा प्रचार करावा, असा सल्ला दिला.
विविध वनौषधी
रोपांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते गावातील जिल्हा परिषदेच्या परिसरात लागवडी
करीता वाटप करण्यात आले. स्वच्छता मोहीमे अतंर्गत स्वंयसेविकांनी जिल्हा परिषद शाळा व गावपरिसर
स्वच्छ केला. प्रास्तविक कार्यक्रमाधिकारी डॉ. जयकुमार देशमुख
यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कार्यक्रमाधिकारी प्रा. विजयकुमार जाधव यांनी
तर आभार प्रदर्शन कार्यक्रमधिकारी प्रा. संजय पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. रवींद्र शिंदे, कार्यक्रमाधिकारी
डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. अनंत बडगुजर, ज्ञानेश्वर शिंदे, केदार बारोळे, प्रियंका
वालकर, नेहा कच्छवे, गोविंद टोम्पे, मयूर असेवार आदीसह रासेयोचे स्वयंसेवक व स्वंयसेविकांनी
परिश्रम घेतले.