वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या लातुर येथील
कृषि महाविद्यालयात दिनांक ९ व १० ऑक्टोबर रोजी आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव २०१८ नटरंग आयोजन करण्यात आले होते. युवक महोत्सवाचे
उदघाटन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते करण्यात आले तर दयानंद कला महाविद्यालयाचे
सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा डॉ संदीप जगदाळे, शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील,
विद्यार्थ्यी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, प्राचार्य डॉ. अरुण कदम, प्राचार्य
प्रा. हेमंत पाटील, डॉ. उद्य खोडके, सौ.आशा देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले की, कला ही मानवी जीवनात
नवचैतन्य व आनंद निर्माण करते, कलाकाराला प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविता
येते. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी एकतरी कला जोपासली पाहिजे. कलेची ताकद
ओळखता आली पाहिजे, कलेव्दारे नवीन अविष्कार घडविता आला पाहिजेत. कलेला कोणतीही सीमा
नसते, भाषा कलेला बांधून ठेवू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त करून लातुर कृषि
महाविद्यालयाने युवक महोत्सवाचे शिस्तबद्ध व नीटनेटक्या आयोजनाबाबत कौतुक केले.
प्रा. डॉ. संदीप जगदाळे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना कलेची
भक्ती आणि साधना करण्याचा सल्ला देऊन सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व
जडणघडनेत महत्वाची भूमिका निभावतात, कलेव्दारे सामाजिक ऋण फेडता येते व समाज
परिवर्तनही करणे शक्य असल्याचे सांगितले.
शिक्षण संचालक डॉ.विलास पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, कलाकार हे
ईश्वराचे रूप असून कला ही जीवन कसे जगायचे हे शिकवते असे सांगुन विद्यार्थ्याचा
जडणघडण प्रक्रियेत कला आणि क्रीडा यांचा अभ्यासाबरोबर महत्वाचा वाटा असल्याचे विषद
केले.
यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख व डॉ. उदय खोडके
यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अरुण कदम
यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे यांनी केले तर आभार डॉ. विजय
भांबरे यांनी मानले.
सदरिल युवक महोत्सवात विद्यापीठांतर्गत घटक व सलंग्न महाविद्यालयातील २७ संघाच्या ५२५ विद्यार्थ्यांनी व १२५ संघ
व्यवस्थापक व प्रशिक्षकांनी विविध कलाप्रकारात सहभाग नोंदवुन आपल्या कलागुणांचे
उत्कृष्ट असे सादरिकरण केले. विविध कला क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त साधारणत:
१५० यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनी व ८ विजेत्या संघांचा चषक देऊन मान्यवरांच्या
हस्ते गौरविण्यात आले. सदरील युवक महोत्सव उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला, कार्यक्रम
यशस्वीसाठी डॉ. व्ही. बी. कांबळे, डॉ. बी. एस. इंदुलकर, डॉ. पी. एच. वैद्य, डॉ. व्ही.
के. भांबरे, डॉ. आर. डी. शेळके, डॉ. व्ही. डी. सुर्वे, प्रा. डी. जी. मोरे आदीसह महाविद्यालयातील प्राध्यापक,
कर्मचारी व विध्यार्थीनी परिश्रम घेतले.