वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालय, कृषि अन्नतंत्र महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय यांच्या
संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे कारेगांव येथे
दिनांक 25 ते 31 मार्च दरम्यान कालावधीत आयोजित करण्यात आले असुन दिनांक 28
मार्च रोजी रासेयोतुन युवा शक्तीचा विकास याविषयावर प्रमुख वक्ते योगेश महाराज
सेलुकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले हे होते तर जिमखाना उपाध्यक्ष तथा
विभाग प्रमुख डॉ सय्यद इस्माईल, शिक्षण विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ आर व्ही चव्हाण,
संतोष भालेराव, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. एस पी सोळंके, प्रा व्ही बी जाधव, डॉ जे डी देशमुख, डॉ पी एच
गौरखेडे, प्रा एस एन पवार, प्रा पी यु घाटगे, प्रा एस के सदावर्ते आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना योगेश
महाराज सेलुकर म्हणाले की, पुरातन भारतीय शिक्षण पध्दती विद्यार्थ्यी केंद्रीत
होती व ही शिक्षण पध्दतीत विद्यार्थ्यांचा सर्वांगिण व्यक्तीमत्व विकासास
पुरक होती. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन
धनश्री जोशी व दिपाली जाधव यांनी केले तर आभार विशाल सरवदे यांनी केले. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी रासेयोचे स्वयंसेवक व स्वयंसेवका अच्युत पिल्लेवाड, कृष्णा
शिंदे, येशे अमिल, नितेश वैद्य, कृष्णा उफाड, मेघा कोहुरवार, पुजा जाधव, तुलसी
चांडक, स्वप्नील झरकर, सिध्देश्वर शिंदे, तुकाराम चव्हाण, पल्लवी बोबडे
आदींनी परिश्रम घेतले.