औरंगाबाद: वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्र व आत्मा
औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषि विज्ञान केंद्रात दिनांक 27 ते 29
मार्च दरम्यान दुग्ध प्रक्रिया विषयाचे तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
झाला, यात मौजे आंबेगांव (ता गंगापुर, जि औरंगाबाद) येथील महिला बचत गटातील 20 महिलांनी सहभाग नोंदविला. दि 29 मार्च रोजी प्रशिक्षणार्थींना
प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रम समन्वयक प्रा दिप्ती पाटगांवकर
यांनी महिलांनी दुध प्रक्रिया पदार्थ बनवुन गटामार्फत विक्री करण्याचे आवाहन केले
तर आत्मा प्रकल्प उपसंचालक श्री पी बी आव्हाळे यांनी महिलांनी दैनंदिन जीवनात
आवश्यक असणारे दही, ताक, तुप याची निर्मिती करून व योग्य त्या लायसन्स काढुन
पदार्थ विक्री करावी असा सल्ला देऊन आत्मा अंतर्गत विविध उपक्रमांची माहिती
दिली.
प्रशिक्षणात दुग्ध व्यवसाय सुरू
करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे, व्यवसायासाठी लागणारे विविध परवाणे, यंत्रसामग्री,
पदार्थ्यांची पॅकींग, विविध भारतीय दुधजन्य पदार्थ्यांची निर्मितीचे प्रशिक्षण
देण्यात आले. तसेच टंचाई परिस्थितीत पशु व्यवस्थापनात हायड्रोपोनिक्स अॅझोला, चारा
प्रक्रिया आदी विषयावर प्रशिक्षण समन्वयक डॉ अनिता जिंतुरकर यांनी मार्गदर्शन केले.
एमआयटी अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक रोडगे यांनी महिलांसाठी
उपयुक्त दुध प्रक्रिया उपक्रमांची माहिती देऊन एमआयटी केयर्स येथे भेटीचे नियोजन केले.
पॅकिंग, रेडींग, खवा मशीन, कुल्फी मशीन यावर प्रा स्नेहल पांडे, प्रा श्रृतीका
देव, प्रा प्रविण वैरागर आदींनी मार्गदर्शन केले.