वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातील एमएस्सी (कृषि) पदव्युत्तर
विद्यार्थ्याना विभागातर्फे निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर राहुरी येथील मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. अशोक कडलग, विभाग प्रमुख डॉ. सय्य्द इस्माईल, डॉ. भगवान आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण
म्हणाले की, विद्यार्थ्यींनी
अपयशाने खचुन न जाता, नैराश्यावर मात करत यशासाठी सातत्याने
प्रयत्न करावेत. जीवनात
नेहमीच सकारात्मक विचार ठेवावा. मृदविज्ञान
विभागाचा शेतकऱ्यांबरोबर जवळचा संबंध असुन विद्यार्थ्यानी ज्ञानाचा वापर समाजाचा अर्थात शेतकऱ्यांच्या
विकासासाठी करावा. प्रमुख पाहुणे डॉ अशोक कडलग यांनी विद्यार्थ्यांचा आयुष्यात मृदा पृथ:करणाचे तंत्रज्ञान आत्मसात करुन त्याचा शेतकऱ्यासांठी उपयोग
करावा असे नमुद केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात डॉ. प्रविण
वैद्य यांची नवी दिल्ली येथील भारतीय मृद विज्ञान संस्थेचे सोसायटीच्या संशोधन नियतकालिकेचे सल्लागार म्हणुन तर डॉ. पपीता गौरखेडे व डॉ भगवान असेवार यांची हैद्राबाद येथील भारतीय कोरडवाहु शेती सोसायटीच्या संशोधन नियतकालिकेचे कार्यकारी सदस्य म्हणुन निवडी बदल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन कु. सरपे या हिने केले. कार्यक्रमास विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, पदव्युत्तर विद्यार्थी मोठया
संख्येने उपस्थीत होते.