वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी
कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत एकात्मिक शेती पध्दती केंद्र येथे कार्यरत असलेल्या
कृषीदुतांनी मौजे टाकळगव्हाण येथे जनावरांचे लसीकरण शिबिराचे आयोजन दिनांक 22
जुलै रोजी केले होते. या शिबिरात पाचशे पेक्षा जास्त जनावरांचे लसीकरण
पशुवैद्यकिय अधिकारी डॉ सय्यद रहीम यांनी केले. पाऊसाळी हंगामात जनावरांना विविध
रोगांची लागण होते, त्यामुळे वेळीच उपचार करण्याची गरज असल्याचे पशुवैद्यकिय
अधिकारी डॉ सय्यद रहीम यांनी सांगुन जनावरांच्या विविध रोग व उपचाराबाबत माहिती
दिली. सदरिल कार्यक्रम प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, रावे समन्वयक डॉ राकेश अहिरे,
केंद्र प्रमुख डॉ ए एस कार्ले, कार्यक्रम अधिकारी डॉ ए टी शिंदे, डॉ एस टी शिराळे यांच्या
मार्गदर्शनाखाली कृषीदुत कृष्णा उफाड, वैभव राऊत, निलेश वैद्य, लोकडेश्वर शिंदे,
कृष्णा शिंदे, राजकुमार राचरकर, अच्युत पिल्लेवाड, विशाल सरोदे, आनंद डोंगरे,
प्रद्युम्न वाघ आदीं यशस्वीरित्या पार पाडला.