वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात अवयवदान यावर ऑनलाईन कार्यक्रम संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या वतीने जागतिक अवयवदान दिनानिमित्त दिनांक 17 ऑगस्ट रोजी ‘अवयवदान एक जागृती’ यावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख व्यक्ते म्हणुन पालघर येथील शरीर व अवयवदान संस्थेचे संस्थापक श्री पुरूषोत्तम पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात श्री पुरूषोत्तम पवार म्हणाले की, एखादया व्यक्तीच्या मेंदुचा मृत्यु झाला तर अवयवदान करता येते, यामुळे अनेकांना जीवदान मिळु शकते. एका व्यक्तीने नेत्रदान केल्यास किमान चार व्यक्तींना दृष्टीने देऊन त्यांचा जीवनातील अंधकार आपण मिटवु शकतो. आज श्रीलंका सारखा छोटा देशात मोठया प्रमाणात मृत्य व्यक्तीचे डोळातील कॉर्निया दान करून निर्यात केली जाते. राज्यातील प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ मा डॉ तात्याराव लहाने यांना आईनी किडनी देऊन प्राण वाचविले, तेच डॉ तात्याराव लहाने आज अनेकांन दृष्टी देण्याचे कार्य करत आहेत.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, समाजात अवयवदानाबाबत अनेक गैरसमज व अंधश्रध्दा आहेत, त्या दुर करण्याकरिता सातत्याने जनजागृती करण्याची गरज आहे. दोन वर्षापुर्वी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या उस्मानबाद कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थी स्व ऋषिकेश एंगडे याचा एका अपघातात मृत्यु झाला, त्यांच्या कुटुबांनी अवयवदानाचा निर्णय घेतला, त्याचे दोन डोळे, किडनी, लिव्हर आदी अवयवदान करून पाच रूग्नांना देऊन एक आदर्श समाजा पुढे ठेवला आहे.
मार्गदर्शनात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले म्हणाले की, आज वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती होत असुन अवयवदान करून मृत्यु नंतरही आपण अवयवरूपी जगात राहु शकतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्हाण यांनी केले तर आभार डॉ अनुराधा लाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ विनोद शिंदे, डॉ अनंत बडगुजर आदीसह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ऑनलाईन कार्यक्रमास मोठया संख्येने महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते.