कोरोना विषाणु रोगाच्या पार्श्वभुमिवर याप्रकारची सुविधा उपलब्ध करणारे राज्यातील एकमेव कृषि विद्यापीठ
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषद पुरस्कृत
सेंटर ऑफ एक्सलंस,
राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) वतीने
विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत व नाहेप प्रकल्प कार्यालयात चेहराची ओळखणारी बहुउद्देशीय बायोमेट्रिक मशिनचे उदघाटन स्वातंत्रदिनाचे औजित्य साधुन दिनांक १५
ऑगस्ट रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री
रणजित पाटील, प्राचार्य डॉ उदय खोडके, नाहेपचे
मुख्य अन्वेषक डॉ गोपाल शिंदे, डॉ भगवान आसेवार, डॉ राजेश कदम आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
सदरिल बहुउद्देशीय बायोमेट्रिक मशिनला कोणताही स्पर्श न करता, सेन्सरव्दारेच चेहराची ओळख होते, व्यक्तीच्या शरीराचे तापमानही नोंद केले जाते तसेच संबंधीत व्यक्तीचे आरोग्य कार्डही तयार होते. व्यक्तीचे शरीराचे तापमान जास्त असल्यास अर्लाम वाचतो, यामुळे आजारी व्यक्तीची ओळख होते. सद्याच्या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत व नाहेप प्रकल्प कार्यालयाच्या प्रवेशव्दारे जवळ हे मशीन बसविण्यात आलेे आहे, यात व्यक्तीच्या नाडीचे ठोक्याची नोंद व सॅनिटयझरची सुविधा आहे. याप्रकारचे मशिन सुविधा उपलब्ध करणारे राज्यातील एकमेव कृषि विद्यापीठ ठरले असुन यामुळे कोरोना विषाणु रोगाच्या पार्श्वभुमीवर आजारी रूग्णाचा अंदाज येऊ शकतो तसेच वेळीच दक्षता घेतली जाऊ शकते, अशी माहिती नाहेप प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ गोपाल शिंदे यांनी दिली. उदघाटन कार्यक्रम प्रसंगी डॉ संजय पवार, डॉ मेघा जगताप आदीसह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.