मराठवाडयातील
औरंगाबाद व जालना जिल्हयात मका पिकाची मोठया प्रमाणात लागवड करण्यात येते, यावर
लष्करी अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
कृषि किटकशास्त्र विभाग, राष्ट्रीय कृषि उच्च्ा
शिक्षण प्रकल्प (नाहेप), औरंगाबाद
कृषि विभाग व नवी दिल्ली येथील साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर यांच्या संयुक्त
विद्यमाने मक्यावरील लष्करी अळी जागरूकता व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक
५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३०
ते ८.००
दरम्यान झुम अॅप व युटुब्यच्या माध्यमातुन ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमास
प्रमुख पाहुणे म्हणुन कृषि शास्त्रज्ञ निवड समितीचे माजी अध्यक्ष तथा जेष्ट
शास्त्रज्ञ मा डॉ चारूदत्त मायी हे उपस्थित राहणार असुन अध्यक्षस्थानी कुलगुरू
मा डॉ अशोक ढवण राहणार आहेत. शिक्षण संचालक डॉ धर्मराज
गोखले, संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ
देवराव देवसरकर, विभागीय
कृषि सहसंचालक डॉ दिनकर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तांत्रिक
सत्रात मका पिकाचे तर्कशुध्द लागवड तंत्रज्ञान, लष्करी
अळी व्यवस्थापन, औरंगाबाद
विभागातील मक्यावरील लष्करी अळीची सद्यस्थिती, लष्करी
अळीचे एकात्मिक व्यवस्थापन आदी विषयावर नवी दिल्ली येथील आयआयएमआरचे माजी
संचालक डॉ सैनदास, एसएबीसीचे
संचालक डॉ भगिरथ चौधरी, विभागीय कृषि सहसंचालक डॉ
दिनकर जाधव, किटकशास्त्रज्ञ
डॉ बस्वराज भेदे आदी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या झुम मिटिंग मध्ये सहभाग घेण्यासाठी
मिटिंग आयडी 941 535 0616 व पासवर्ड 12345 याचा वापर करावा.