Friday, November 27, 2020

सामुदायिक विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख मोठया संधी ...... मा डॉ पी एस पांडे

 वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने आयोजित एक दिवसीय वेबिनार संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि नाहेप प्रकल्‍प यांचे  संयुक्त विद्यमाने दि. 26 नोव्हेंबर रोजी सामुदायिक विज्ञान शाखेतून व्यवसायाभिमुख संधी यावरील राज्यस्तरीय एक दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू  मा डॉ अशोक ढवण हे होते तर विशेष अतिथी म्‍हणुन भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. पी एस पांडे हे उपस्थित होते. तसेच भुवनेश्वर येथील संचालक डॉ. एस के श्रीवास्तव, पंतनगर येथील गोविंद वल्लभ पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्या डॉ. रीता रघुवंशी, जय शंकर तेलंगाना राज्य कृषी विद्यापीठ, हैदराबाद येथील माजी प्राचार्या डॉ. ए मृणालिनी प्राचार्या डॉ. जयश्री झेंड, नाहेप प्रकल्‍प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

मार्गदर्शनात डॉ. पी एस पांडे म्‍हणाले की, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय विद्याशाखेच्या कालानुरूप झालेल्या अभ्यासक्रमात मोठा बदल करण्‍यात आला आहे. मानव निगडित शास्त्रोक्त अभ्यासक्रम असणाऱ्या या विद्याशाखेतून अनेकविध संधी विद्यार्थ्यांसाठी आहेत. या सर्व बाबींचा अभ्यास करून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळातील गरजा ओळखून नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांची निवड करावी व आपले भविष्य उज्वल करावे, असे वक्तव्य केले.

अध्यक्षीय मार्गदर्शनातून कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील शिक्षणाद्वारे उपलब्ध विविध विषयातील संधींचा उहापोह केला तसेच अनेक क्षेत्रातील या वेबीनारला उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्रमुख अतिथी डॉ. एस के श्रीवास्तव, डॉ. रीता रघुवंशी तसेच डॉ. ए मृणालिनी यांनी  या विद्याशाखेचा भारतातील इतिहास, त्यामध्ये झालेले बदल, पाचव्या डीन समिती नुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रत्यक्ष अनुभव देणारा करण्यात आलेला अभ्यासक्रम, याविषयी माहिती दिली.

प्राचार्य डॉ. जयश्री झेंड यांनी राज्‍यातील चार ही कृषी विद्यापीठामध्‍ये केवळ परभणी येथेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालय एकमेव विद्याशाखे असुन येथे प्रशस्त इमारत, प्रात्यक्षिकांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा, मुलींचे वस्तीग्रह, जिमखाना, शिष्यवृत्ती, वाचनालय आदींची सोई असल्‍याची माहिती दिली.

वेबिनार मध्‍ये महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनीनी त्यांच्या जीवन प्रवासात, त्यांना या शाखेमधून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग, त्यांचे करिअर घडवण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक जीवनात कसे प्रभावी ठरले, याबद्दल अत्यंत विस्तृत पद्धतीने विषद केले. माजी विद्यार्थ्यांमध्ये डॉ. मंजुषा मोळवणे, महिला आयोगाच्या अध्यक्ष , डॉ. सविता शेटे, प्राचार्य, महिला कला महाविद्यालय, बीड, प्राचार्य अर्चना साखरे, इंटेरियर डिझायनर पुणे मेधा खेडकर, श्री अंशु सिन्हा, जनरल मॅनेजर  झी लर्न इन्स्टिट्यूट, मुंबई , दीपाली देशपांडे, बेकरी युनिट मॅनेजर, संचालिका मेघा बागुल, किड्स  हब, परभणी, आई आयटी अकॅडमी, पुणे वर्षा नांदेडकर, दीप्ती पाडगावकर, केवीके, औरंगाबाद, प्रवीण सानप, सोशल वर्कर, आयसीएमआर इन्स्टिट्यूट, पुणे, सीमा मेढे, पोस्ट डॉक्टरेट विद्यार्थिनी, बँकोक इत्यादी अनेकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

या विद्याशाखेतील पाच विषयांतर्गत मिळणारे ज्ञान, प्रात्यक्षिक, प्रत्यक्ष अनुभव याविषयी डॉ. जया बंगाळे, विभाग प्रमुख, मानव विकास विभाग, डॉ. माधुरी कुलकर्णी, प्राध्यापक, साधनसंपत्ती व्यवस्थापन व ग्राहक विज्ञान विभाग, डॉ. सुनिता काळे प्राध्यापक वस्त्र शास्त्र प्रावरणे विभाग, डॉ. फर्जाना फारुखी, सहयोगी प्राध्यापक, अन्‍न व पोषण विज्ञान विभाग तसेच डॉक्टर शंकर पुरी, विभाग प्रमुख, सामुदायिक शिक्षण आणि संप्रेषण व्यवस्थापन विभाग यांनी पॉवर पॉईंट च्या माध्यमातून विषयांची माहिती दिली.

कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून जवळपास ५०० पेक्षा जास्‍त विद्यार्थी, शिक्षक, पालक, व्यावसायिक,माजी विद्यार्थी आदींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ अशा आर्य, माजी विभाग प्रमुख, अन्न शास्त्र विभाग यांनी विशेष सहकार्य केले. नाहेप चे श्री अविनाश काकडे, कु. मुक्ता शिंदे तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात सर्व कर्मचाऱ्यांनी  मदत केली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन  वेबिनार च्या आयोजन सचिव डॉ.  वीणा भालेराव यांनी केले.