कुलगुरू यांचे शालेय शिक्षण लातुर जिल्हयातील
मौजे उजनी येथील शाळेत झाले. तर मा श्री देशपांडे सर यांचे मौजे उजणी जवळील मौजे धुत्ता हे मुळगाव होते. मा श्री देशपांडे सर पावसाळयात नदी पोहुन पार करून शाळेत
शिकविण्यासाठी येत असत. सध्या मा श्री देशपांडे सरांचेे वय नव्वद वर्ष आहे.
यावेळी मा श्री देशपांडे सरांबाबत कृतज्ञता व्यक्त करतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, शालेय जीवनातच मी मराठी व हिंदी भाषेवर प्रभुत्व प्राप्त करू शकलो, याचे श्रेय शालेय शिक्षक मा श्री देशपांडे सरांना जाते. शिस्तीचे भोक्ते व हाडाचे शिक्षक म्हणुन त्यांची ओळख होती. विद्यार्थ्यांमध्ये मा श्री देशपांडे सरांचा मोठा दरारा असत. शालेय शिक्षणात जपानची भात शेती हा पाठ श्री देशपांडे सर शिकवित असतांना शेती हे केवळ उदरनिवार्हाचे साधन नसुन ते शास्त्र व विज्ञान असल्याची बाब मनात बिंबवली, याची परिनिती पुढे मी कृषि शिक्षणाची कास धरली, असे सांगुन माननीय कुलगुरू यांना नैतिकचे धडे ही मा श्री देशपांडे सराकडुन मिळल्याचे सांगितले.
तब्बल तीस वर्षानंतर गुरु - शिष्य भेट झाली, या भेटी दरम्यान दोघांनीही जुन्या आठवणी जागवविल्या, मा श्री देशपांडे सरांचेही डोळे पाणावले. त्यांचा विद्यार्थ्यी राज्यातील दोन कृषि विद्यापीठाचे कुलगुरू पदावर कार्यरत असल्यामुळे खुप अभिमान वाटत असल्याचे ते म्हणाले.