माळेगांव खुर्द (ता
बारामती) येथे राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संशोधन
संस्था व अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र तसेच बायर
संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचे दिनांक 18 ते 22
जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले असुन कृषिक तंत्रज्ञान प्रदर्शन भरविण्यात
आले. सदरिल प्रदर्शनात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित विविध कृषि अवचारे
व यंत्राचे स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. यात बहुउद्देशीय बीबीएफ यंत्र, सौर
ड्रायर, बैलचलित कृषि प्रक्रिया युनिट, आदीचे प्रात्यक्षिके दाखविण्यात येत असुन
कृषि अभियंता डॉ. स्मिता सोलंकी व डॉ राहुल रामटेके हे विद्यापीठ विकसित यंत्राची
माहिती देत आहे. या विद्यापीठ दालनास माजी केंद्रीय कृषिमंत्री मा ना श्री
शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री मा श्री अजितदादा पवार, जलसंधारण मंत्री मा ना श्री
जयंत पाटील, मृदा व जलसंवर्धन मंत्री मा ना श्री शंकरराव गडाख, कृषि मंत्री मा ना
श्री दादाजी भुसे, कृषि राज्यमंत्री मा ना श्री विश्वजीत कदम, पशुसंवर्धन राज्यमंत्री
मा श्री दत्तात्रय भरणे, कृषि आयुक्त मा श्री धीरजकुमार, कृषि सचिव मा श्री
एकनाथ डवले, खासदार मा सौ सुप्रियाताई सुळे, आमदार मा श्री रोहित पवार, मा श्री
राजेन्द्र पवार, माजी कुलगुरू डॉ एस एस मगर आदीसह शेतकरी बांधवानी भेटी देऊन
माहिती घेतली. विद्यापीठ विकसित कृषि यंत्र व अवचाराबाबत शेतकरी बांधवामध्ये मोठी
उत्सुकता दिसुन आली.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA