परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठातील कृषी विद्या शाखेत आचार्य पदवी संपादन केलेले विद्यार्थी डॉ.
हनुमान गरुड यांना नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी ऑफ अग्रोनोमी - आयएआरआय यांच्या
तर्फे देण्यात येणारा आयएसए - बेस्ट
पिएचडी थेसिस अवार्ड (वेस्ट झोन) प्रदान करण्यात आला. हैदराबाद येथे नुकत्याच पार
पडलेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय अग्रोनोमी कॉंग्रेस २०२१ मध्ये क्रॉप सायन्स
सोसायटी ऑफ अमेरिकाचे अध्यक्ष मा डॉ. पी. व्ही. वाराप्रसाद आणि राणी लक्ष्मीबाई
केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. पंजाब सिंग यांच्या प्रदान करण्यात आला,
यावेळी
इंडिअन सोसायटी ऑफ अग्रोनोमी चे अध्यक्ष तथा हैदराबाद येथील तेलंगना कृषी
विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. प्रवीण राव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे
कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ.
व्ही. एम. भाले आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ.
हनुमान गरुड यांना रोख दहा हजार रुपये तसेच प्रशस्तीपत्र देऊन प्रदान करण्यात आला.
डॉ हनुमान गरूड यांच्या आचार्य
पदवी चा शोधप्रबंध “परफॉर्मन्स ऑफ डिफरंट लेंड कॉन्फिग्युरेशन अंडर पिजनपी बेसड
इंटरक्रॉपिंग सिस्टीम्स” या विषयावर होता. त्यांचे आचार्य पदवी चे मार्गदर्शक कृषी
विद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. भगवान आसेवार हे होते तर सल्लागार समिती मध्ये कुलगुरू
मा. डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, डॉ. मिर्झा आयएबी आणि डॉ. आर.
व्ही. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या पुरास्कारासाठी डॉ. हनुमान गरुड यांची
वेस्ट झोन (महाराष्ट्र गुजरात, गोवा आणि राजस्थान) मधून निवड झाली.