माननीय
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषि
व किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी यांच्या नेतृत्वात दिनांक १ जून
ते ३० जून २०२६ या कालावधीत देशभर राबविण्यात येत असलेल्या “खेत बचाओ अभियान”
अंतर्गत मौजे वाल्हा (ता. बदनापूर,
जि. जालना) येथे अभियानाचा उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या अभियानाचा शुभारंभ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते दिनांक २ जून २०२६ रोजी करण्यात आला.
यावेळी वाल्हा
गावचे सरपंच श्री. कोल्हे, उपसरपंच श्री. सचिन घाडगे, माजी सभापती पंचायत समिती श्री. संजयजी जगदाळे,
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री. बद्रीभाऊ पठारे, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषी महाविद्यालय बदनापूरचे अधिष्ठाता डॉ. डी. के. पाटील, सहयोगी संचालक डॉ. एस. बी. पवार, कृषी विज्ञान
केंद्राच्या प्रमुख डॉ. दीप्ती पाटगावकर, कृषी विज्ञान
केंद्र बदनापूरचे प्रमुख डॉ. सोमवंशी, विद्यापीठातील
शास्त्रज्ञ, २०० हून अधिक शेतकरी तसेच रावेचे १००
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी
मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मृदा आरोग्य
संवर्धन, संतुलित खतांचा वापर,
सेंद्रिय व जैविक खतांचा अवलंब तसेच शाश्वत शेती पद्धतींचे महत्त्व
अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, जमिनीचे आरोग्य टिकवून
ठेवणे ही काळाची गरज असून मृदा परीक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी योग्य खत
व्यवस्थापन स्वीकारल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होऊ शकते.
विस्तार
शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट करताना सांगितले
की, विद्यापीठातील
शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रे व कृषि प्रसार यंत्रणा
गावागावांत जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणार आहेत. अभियानांतर्गत मृदा
परीक्षण, शेतकरी मेळावे, प्रात्यक्षिके,
मार्गदर्शन शिबिरे तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात
येणार आहे.
कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका, संतुलित खत व्यवस्थापन तसेच पिकनिहाय शिफारसींबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही अभियानात सक्रिय सहभाग घेत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त केला.



.jpeg)


.jpeg)

.jpeg)
.jpeg)