सौरऊर्जा निर्मितीसोबतच शेतीतील पीक उत्पादन वाढविण्याच्या संधींचा शोध
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे
कार्यरत असलेल्या ॲग्रीफोटोव्होल्टाइक्स संशोधन प्रकल्पांतर्गत दिनांक १२ ऑक्टोबर
२०२६ रोजी एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत
सौरऊर्जा निर्मितीसोबतच शेतीचे उत्पादन टिकवून ठेवणे, सौर
पॅनेलखाली घेता येणारी पिके, आर्थिक नियोजन तसेच या तंत्रज्ञानाच्या कृषि क्षेत्रातील
उपयुक्ततेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन व अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. यावेळी त्यांनी मागील तीन
वर्षांतील संशोधनाच्या आधारे सौर पॅनेलखाली घेता येणारी पिके, पिकांच्या
उत्पादनावर होणारा परिणाम आणि पीक उत्पादनातील संभाव्य घट व विद्युतनिर्मिती यांचा
समतोल कसा साधता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. ॲग्रीफोटोव्होल्टाइक्स
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेती आणि सौरऊर्जा निर्मिती यांची सांगड घालणे
शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यशाळेत ॲग्रीफोटोव्होल्टाइक्स क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून
भारतीय कृषि संशोधन संस्था (आयएआरआय), नवी दिल्ली येथील सेंटर ऑफ एक्सलन्सचे डॉ. डी. के. सिंग आणि
डॉ. मुर्तुझा हसन यांनी आपले संशोधन सादर केले. तसेच, कॉलेज ऑफ
ॲग्रिकल्चरल बँकिंग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पुणे येथील
इंजि. सचिन कांबळे यांनी ॲग्रीफोटोव्होल्टाइक्स प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेल्या
वित्तीय योजना, आर्थिक साहाय्य आणि वित्तपुरवठ्याच्या विविध पर्यायांबाबत
मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थित संशोधक व शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन
केले.
कार्यशाळेस अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.
एस. के. मित्तल आणि उत्तर प्रदेशचे निवृत्त पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. सूर्यकांत
त्रिपाठी यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या सादरीकरणातून आरोग्य व
अन्नसुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणारी
आर्थिक फसवणूक ओळखणे व ती टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याविषयी सविस्तर
मार्गदर्शन केले.
या प्रसंगी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्री. प्रांजल
गुल्हाने आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. प्रशांत
गायकवाड उपस्थित होते. पाथरीचे माजी सभापती तथा शेतकरी श्री. राजेशजी ढगे यांनी
सौरऊर्जेवर आधारित शेतीविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी उपस्थित तज्ज्ञांशी
संवाद साधून या तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष शेतीतील वापराबाबत चर्चा केली.
ॲग्रीफोटोव्होल्टाइक्स संशोधन प्रकल्पाच्या प्रमुख डॉ.
गोदावरी पवार यांनी कार्यशाळेची उद्दिष्टे, प्रकल्पाची
पार्श्वभूमी, प्रकल्पाच्या कामकाजाची सुरुवात तसेच जर्मन विकास सहकार्य
संस्थेसोबत (GIZ) विद्यापीठाने केलेल्या सामंजस्य कराराची उद्दिष्टे व
महत्त्व याविषयी माहिती दिली.
संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या प्रयत्नांतून या
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विस्तार शिक्षण संचालक तथा संशोधन संचालक
(प्रभारी) डॉ. राकेश अहिरे यांनी उपस्थित शास्त्रज्ञांना मार्गदर्शन केले.
ॲग्रीफोटोव्होल्टाइक्स प्रकल्पांतर्गत सुरू असलेले संशोधन भविष्यात शेतकऱ्यांसाठी
निश्चितच लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करून या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी
विद्यापीठ पुढाकार घेईल, असे त्यांनी सांगितले.
संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी मागील तीन
वर्षांत ॲग्रीफोटोव्होल्टाइक्स क्षेत्रात संशोधन पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे
अभिनंदन केले. या क्षेत्रात संशोधनाच्या मोठ्या संधी उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी
मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून भविष्यात या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून
नावारूपाला यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या राष्ट्रीय कार्यशाळेस विद्यापीठातील सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, संशोधन
केंद्रांचे प्रमुख, प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन डॉ विणा भालेराव
यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी ॲग्रीफोटोव्होल्टाइक्स संशोधन प्रकल्पातील
शास्त्रज्ञ डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. विक्रम घोळवे, डॉ. पी. एस. कापसे आणि डॉ. विशाल इंगळे यांनी तांत्रिक
मार्गदर्शन केले. तसेच सहभागी मान्यवरांना प्रकल्पाच्या प्रक्षेत्राची भेट घडवून
आणली. कार्यशाळेच्या आयोजनासाठी श्री. संदीप शिंदे आणि श्री. निरंजन शिंदे यांनी
विशेष परिश्रम घेतले.
.jpeg)
National Workshop on Agriphotovoltaics Successfully Held at
VNMKV, Parbhani
Exploring Opportunities to Enhance
Agricultural Productivity Alongside Solar Energy Generation
A one-day national workshop was organized on 12 October 2026 under
the Agriphotovoltaics Research Project at Vasantrao Naik Marathwada Krishi
Vidyapeeth (VNMKV), Parbhani. The workshop focused on maintaining agricultural
productivity alongside solar energy generation, identifying suitable crops for
cultivation beneath solar panels, financial planning, and the practical
applications of agrivoltaic technology in agriculture.
The inaugural session was presided over by the Hon’ble
Vice-Chancellor of the University, Prof. (Dr.) Indra Mani, who also inaugurated
the workshop. Drawing on research conducted over the past three years, he
provided insights into crops suitable for cultivation beneath solar panels, the
impact of solar panels on crop yields, and strategies for balancing potential
reductions in agricultural production with electricity generation. He
emphasized that effective implementation of agrivoltaic technology could
successfully integrate agriculture with solar energy production.
Experts in the field of agrivoltaics, Dr. D. K. Singh and Dr.
Murtuza Hasan from the Centre of Excellence at the Indian Agricultural Research
Institute (IARI), New Delhi, presented their research findings. Er. Sachin Kamble
from the College of Agricultural Banking, Reserve Bank of India, Pune,
explained the financial schemes, financial assistance, and various funding
options available for agrivoltaic projects. He also addressed queries raised by
researchers and farmers attending the workshop.
The workshop was graced by the special presence of Prof. Dr. S. K.
Mittal from Purdue University, USA, and Dr. Suryakant Tripathi, retired Deputy
Inspector General of Police from Uttar Pradesh. Through their presentations,
they highlighted the importance of health and food security. They also provided
detailed guidance on identifying and preventing financial fraud associated with
the use of modern technologies and explained the precautions necessary to avoid
such fraud.
Mr. Pranjal Gulhane, District Manager of NABARD, and Mr. Prashant
Gaikwad, District Manager of the Maharashtra Energy Development Agency (MEDA),
were also present. Mr. Rajeshji Dhage, former Chairman of the Panchayat Samiti,
Pathri, and a farmer, shared his views on solar-powered agriculture. He
interacted with the experts and discussed the practical implementation of
agrivoltaic technology in farming.
Dr. Godavari Pawar, Principal Investigator of the Agrivoltaics
Research Project, explained the objectives of the workshop, the background of
the project, the commencement of its activities, and the objectives and
significance of the Memorandum of Understanding (MoU) signed by the University
with the German development cooperation agency, GIZ.
The workshop was organized through the efforts of the Director of
Research, Dr. Bhagwan Asewar. Dr. Rakesh Ahire, Director of Extension Education
and In-charge Director of Research, guided the participating scientists. He
expressed confidence that the research being undertaken under the Agrivoltaics
Research Project would prove beneficial to farmers in the future. He further
stated that the University would take initiatives to promote and disseminate
this technology among the farming community.
Dr. Babasaheb Thombre, Director of Education, congratulated the
students who had completed their research in the field of agrivoltaics over the
past three years. He highlighted the vast research opportunities available in
this emerging field and encouraged students to make effective use of the opportunities
provided to them and establish themselves as experts in agrivoltaics in the
future.
The national workshop witnessed enthusiastic participation from the
University’s Deans, Heads of Departments, Heads of Research Centres, faculty
members, researchers, and students.
Dr. Veena Bhalerao compered the programme and proposed the vote of
thanks. Dr. B. M. Kalalbandi, Dr. Vikram Gholve, Dr. P. S. Kapse, and Dr.
Vishal Ingle, scientists associated with the Agrivoltaics Research Project,
provided technical support and guidance for the successful conduct of the
workshop. They also arranged a visit to the project’s experimental field for
the distinguished participants. Mr. Sandeep Shinde and Mr. Niranjan Shinde made
special efforts to ensure the successful organization of the workshop.


.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
