Saturday, May 18, 2013

मकृविच्‍या खरिप शेतकरी मेळावातील वैशिष्‍टपुर्ण दालनास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद




मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या 41 व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय, इफको आणि महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजीत खरीप शेतकरी मेळाव्‍यात भव्‍य असे कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते यामध्‍ये देशातील अग्रगण्‍य अशा भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या अंतर्गत असलेले विविध संशोधन केंद्रे तसेच खाजगी संस्था व बचत गटांचे शेतक-यांना उपयुक्‍त असलेले दालने हे शेतक-यांसाठी आकर्षणाचा भाग होता. विद्यापीठात प्रथमच या प्रकारचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. भारतीय कृषि संशोधन संस्‍थेच्‍या उद्यानविद्या विभागाचे दालणास शेतक-यांनी मोठा प्रतिसाद दिला. या दालनात सुखलेल्‍या फुलांचे संवर्धन करून अनेक वस्‍तु बनविलेल्‍या होत्‍या, पोलीहाउस मध्‍ये तयार केलेले चेरी टोमॅटो, बी विरहीत काकडी, हिरवी सिमला मिर्ची, बाजरा पफ, भाजलेले सोयाबीन, नैसर्गिक रंगाने बनवलेली पोषक व स्‍वादिष्‍ट ब्रेड, पोलीहाउसचा नमुना, विविध पिकांच्‍या सुधारीत जाती, ठिंबक सिंचन, काटेकोर शेती इत्‍यादीवर पोस्‍टर व विविध प्रकाशने उपलब्ध होती. मका पिकाचे विविध वाण व लागवड तंत्रज्ञान, मुल्‍यवर्धीत पदार्थ यावर आधारीत नवी दिल्‍ली येथील मका संशोधन संचालनालयाचे दालन होते तसेच नागपुर येथील केंद्रिय कापुस संशोधन संस्‍थाचे दालनात कपाशीचे लागवड तंत्रज्ञान, पीक संरक्षण, पाणी व्‍यवस्‍थापन, वेचणी इत्‍यादी विषयांवर माहिती व प्रदर्शन याचा समावेश होतो. मुंबई येथील केंद्रिय कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्‍थाच्‍या दालनात कपाशीच्‍या प-हाटीचा कार्यक्षम वापर, हार्डबोर्ड, कंपोस्‍ट तयार करणे इत्‍यादी विविध पदार्थाची व वस्‍तुंची माहिती, प्रदर्शन व मार्गदर्शन शेतक-यांना केले गेले. भोपाळ येथील केंद्रिय कृषि अभियांत्रिकी संस्‍थेच्‍या दालनात शेतीसाठी उपयुत्‍क अशा विविध अवजारे व यंत्राचे दालण शेतक-यांसाठी विशेष आर्कषण ठरले यात बियाणे व फळे प्रतवारी करणारे यंत्र, विविध फळे काढणी यंत्र, भुईमुग फोडणी व काढणी यंत्र, रोप लावणी यंत्र तसेच सोयाबीनचे मुल्‍यवर्धीत पदार्थ त्‍यात सोया मिल्‍क, सोया नट, सोया पनीर, सोया बिस्किट इत्‍यादींचा समावेश होता. या प्रदर्शनीत प्रथमचे विद्यापीठात 100 पेक्षा जास्‍त दालणाचा समावेश होता, या दालनात शास्‍त्रनासोबत चर्चा करतांना शेतकरी दिसत होते.

Wednesday, May 15, 2013

मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी च्‍या 41 व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त भव्‍य खरीप शेतकरी मेळावा


मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी च्‍या 41 व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालयामार्फत भव्‍य खरीप शेतकरी मेळावाचे आयोजन दिनांक 18 मे, 2013 शनीवार रोजी सकाळी 11.00 वाजता वैद्यनाथ वसतीगृह मैदान, प्रशासकीय इमारीतजवळ करण्‍यात आला आहे. सदरील मेळाव्‍याचे उद्द्याटन महाराष्‍ट्र राज्‍याचे महसुल, पुनवर्सन व मदतकार्य, सहकार पणन व वस्‍त्रउद्योग राज्‍यमंत्री तथा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रकाशदादा सोंळके यांच्‍या शुभहस्‍ते होणार आहे. या कार्यक्रमास सांस्‍कृतिक कार्य, सामान्‍य प्रशासन, शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क, महिला व बाल विकास, राजशिष्‍टाचार व अल्‍पसंख्‍यांक विकास राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान आणि वैद्यकीय शिक्षण, उच्‍च व तंत्रशिक्षण, विशेष सहाय व अपारंपारीक उर्जा राज्‍यमंत्री मा. ना. श्री. डी. पी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या मेळाव्‍यात चर्चासत्र, प्रदर्शन, प्रात्‍यक्षीके, विद्यापीठाची बियाणे विक्री इत्‍यादी उपक्रमांचा समावेश राहणार आहे6. यावर्षी6 मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात राष्ट्रिय पातळीवरील तज्ञ भोपाळ (मध्‍यप्रदेश) येथील केंद्रिय कृषि अभियांत्रीकी संस्‍थ्‍ेा अंतर्गत असलेल्‍या सोयाबीन प्रक्रिया व वापर केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. कुलकर्णी आणि इरगोनॉमीक्‍स अॅन्‍ड सेफटी इन अॅग्रीकलचर प्रकल्‍पाचे प्रकल्‍प समन्‍वयक डॉ. एल. पी. गिते तसेच पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी संशोधन संचालक डॉ. एम. जी. लांडे हे विशेष अथिती म्‍हणुन उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी या शेतकरी मेळाव्‍यात भव्‍य असे कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले असुन यामध्‍ये देशातील अग्रगण्‍य अशा भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या अंतर्गत असलेले विविध संशोधन केंद्रे तसेच खाजगी संस्‍थेचे शेतक-यांना उपयुक्‍त असलेले दालने हे आकर्षणाचा भाग म्‍हणुन राहणार आहे.
      या प्रसंगी विद्यापीठाचे विविध पिकांचे बियाणे विक्रिचे उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते होणार आहे. या मेळाव्‍याचा लाभ मराठवाडयातील व राज्‍यातील जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी व कृषि उद्योजकांनी घ्‍यावा असे आवाहन विद्यापीठामार्फत करण्‍यात आले आहे. 


गृह विज्ञान महाविद्यालयाचा ३८ वा वर्धापनदिन व आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवसाचे आयोजन





Tuesday, May 14, 2013

म.कृ.वि., परभणीत रक्‍तदान शिबीर



      महात्‍मा फुले व भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या संयुक्‍त जयंती कार्यक्रर्मानिमित्‍य काष्‍ट्राईब कर्मचारी महासंघ, म.कृ.वि. यांच्‍या वतीने दि.13/04/2013 रोजी आरोग्‍य केंद्रात रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते. या शिबीराचे उदघाटन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. गोरे यांच्‍या हस्‍ते झाले. कार्यक्रमास संचालक शिक्षण तथा अधिष्‍ठाता डॉ. व्‍ही. एस. शिंदे, संचालक संशोधन डॉ. जी. बी. खंडागळे, सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य, गृहविज्ञान महाविद्यालय, डॉ. विशाला पटनम, कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्‍यक्ष डॉ. गजेंद्र लोंढे, वैद्यकिय अधिकारी डॉ. सुब्‍बाराव यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी शहरातील नामवंत डॉक्‍टर हेमंत गुलवाडी व डॉ. कनकदंडे यांनी रक्‍तदानाचे महत्‍व विषद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. संदिप पायाळ व प्रास्‍तावीक प्रा. अनिस कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वी होण्‍यासाठी महासंघाचे पदाधिकारी डॉ. आसेवार, डॉ. खंदारे, प्रा. सोनकांबळे श्री. घागरमाळे इत्‍यादिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महासंघाचे सर्व पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

म.कृ.वि. परभणी येथे महिलांचे आरोग्‍य व सक्षमीकरण कार्यशाळा कार्यक्रम



म. फुले व भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या संयुक्‍त जयंती कार्यक्रर्मानिमित्‍य गृहविज्ञान महाविद्यालय, म.कृ.वि, परभणी व कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने "महिलांचे आरोग्‍य व सक्षमीकरणासाठी कार्यशाळा आणि हिमोग्‍लोबीन तपासणी" कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. काय्रक्रमासाठी परभणी शहरातील नामवंत नेत्र तज्ञ. डॉ. अर्चना गोरे उपस्थित होत्‍यो. कार्यक्रमात 150 महिला व विद्यार्थीनिंनी सहभाग नोंदवला. गृहविज्ञान महाविद्यालयातील तज्ञामार्फत गृह‍व्‍यवस्‍थापन व आरोग्‍य बाबत कार्यशाळा घेण्‍यात आली. महिलांमध्‍ये हिमोग्‍लागबीनचे महत्‍व व त्‍याचा आरोग्‍याशी संबध यावर सविस्‍तर मार्गदर्शन करण्‍यात आले. ज्‍यांचे हिमोग्‍लोबीन आवश्‍यक प्रमाणात आहे अशा महिलांना "उत्‍कृष्‍ठ आरोग्‍य पुरस्‍काराने" सन्‍मानित करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या, डॉ. विशाला पटनम होत्‍या. कार्यक्रमासाठी डॉ. विजया नलावडे, डॉ. जया बंगाळे, डॉ. माधूरी कुलकर्णी व डॉ. सुनिता काळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्‍ताविक कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्‍यक्ष डॉ. गजेंद्र लोंढे यांनी केलें तर सुत्र संचलन प्रा. निता गायकवाड, यांनी केलें. प्रा. अनिस कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी प्रा. मिलींद सोनकांबळे, डॉ. विश्‍वनाथ खंदारे, डॉ. भगवान आसेवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महिला विद्यार्थिनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या. 

Sunday, May 12, 2013

गृह विज्ञान महाविद्यालयाचा ३८ वा वर्धापनदिन व आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवसाचे आयोजन


गृह विज्ञान महाविद्यालयाचा ३८ वा वर्धापनदिन व आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवसाचे आयोजन 

Saturday, May 11, 2013

माती तपासणी शिबीर





मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृद विज्ञान व रसायनशास्त्र विभाग व भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा, परभणी च्या वतीने नुकतेच फिरत्या माती प्रयोगशाळे मार्फत कौसडी ता. जिंतूर येथे माती तपासणी शिबीर घेण्यात आले.  यात वाघी, कौसडी, मातीवाडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी चार गावातील  शेतकऱ्यांच्या मातीचे ३९० नमुने गोळा करण्यात आले. या शिबिराचा समारोप विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण याच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांनी मार्गदर्शन केले.