Sunday, August 24, 2014

सध्‍याच्या पाण्याच्या ताण परिस्थितीत कोरडवाहु शेतीमध्ये घ्यावयाची काळजी

अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या शिफारशी


सौजन्‍य

डॉ सुरेंद्र चौलवार, डॉ आनंद गोरे, डॉ मदन पेंडके

अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प, वनामकृवि, परभणी

Friday, August 22, 2014

मोसंबी बागायतदारांच्‍या प्रशिक्षण व चर्चासत्रास मोठा प्रतिसाद

मोसंबी बागायतदारांच्‍या प्रशिक्षण व चर्चासत्राचे उदघाटन करतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु 
लिंबुवर्गीय फळपिकावर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियानातंर्गत आयोजित एक दिवशीय प्रशिक्षण व चर्चासत्रात विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु मोसंबी बागायतदारांशी संवाद साधतांना, याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, शास्‍त्रज्ञ डॉ. डि के घोष, डॉ आर ए मराठे, श्री यु आर घाटगे, मोसंबी आदी
******************************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लिंबुवर्गीय फळपिकावर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियानातंर्गत मोसंबी बागायतदारांच्‍या एक दिवशीय प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन दिनांक २० ऑगस्‍ट रोजी बदनापुर जि. जालना येथील मोसंबी संशोधन केंद्रात करण्‍यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, नागपुर येथील राष्‍ट्रीय संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ. डि के घोष व डॉ आर ए मराठे, जालना जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री यु आर घाटगे, मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एम बी पाटील, टिएमसीचे प्रभारी अधिकारी डॉ एम बी सरकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु उदघाटनपर भाषणात म्‍हणाले की, राज्‍यातील शेतकरीच मोठा शास्‍त्रज्ञ असुन शेतक–यांचे शेतीतील अनुभव हे मोसंबी संशोधनाची दिशा ठरविण्‍यासाठी मार्गदर्शक ठरतील. हवामान बदलाचा मोसंबी बागेवरील परिणामावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनीही मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रात डॉ उदय खोडके, डॉ एस पी जिंतुरकर, डॉ एम बी पाटील, डॉ पी डब्‍ल्‍यु एंगडे, डॉ पि ए ठोंबरे, प्रा. कलालबंडी, प्रा एस एच जेधे यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू मा डाॅ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी मोसंबी बागायतदारांच्‍या विविध समस्‍या व अडचणी थेट संवाद साधत समजुन घेतल्‍या तसेच विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी त्‍यास उत्‍तरे दिली.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ एम बी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ नंदकुमार भुते यांनी तर आभार प्रदर्शन डॉ डी के पाटील यांनी यांनी केले. कार्यक्रमास जालना व औरंगाबाद जिल्‍हयातील 200 पेक्षा जास्‍त मोसंबी बागायतदार उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी कार्यक्रमांतर्गत विशेष पीक संरक्षण मोहिमेचे उदघाटन करण्‍यात आले. ही मोहिम दि 20 ऑगस्‍ट ते 20 सप्‍टेंबर दरम्‍यान औरंगाबाद व जालना जिल्‍हात विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्रामार्फत राबविण्‍यात येणार आहे.

चर्चासत्रात शेतकरी – शास्‍त्रज्ञ यांच्‍यातील ठळक मुदयावर चर्चा होऊन पुढील शिफारशी करण्‍यात आल्‍या
1. माती परिक्षण करूनच मोसंबी लागवड करण्‍यात यावी.
2. मोसंबीची 6 बाय 6 मीटर आतंरावरच लागवड करावी.
3. रंगपुर खुंटाचा वापर करूनच न्‍युसेलर मोसंबीची रोपे तयार करावी.
4. सेंद्रिय खते व सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍याचा वापर करावा.
5. ठिबंक सिंचनाच्‍या वापर करून पाण्‍याचे नियोजन करावे.
6. शेतक-यांनी स्‍वतं:च मातृवृक्षबागा तयार करून पुरक व्‍यवसाय निर्माण करावा.

विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी कार्यक्रमांतर्गत विशेष पीक संरक्षण मोहिमेचे उदघाटन करतांना 
मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले

मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक तथा अघिष्‍ठाता डॉ अशोक ढवण
मार्गदर्शन करतांना संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर  

Sunday, August 17, 2014

सोयाबीन व कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव

शेतक-यांनी वेळीच उपाययोजना करण्‍याचे आवाहन

कपाशीवरिल तुडतुडे

कपाशीवरिल फुलकिडे
कपाशीवरिल फुलकिडे
कपाशीवरिल तुडतुडे 
सौजन्‍य 
डॉ बी बी भोसले 
विस्‍तार शिक्षण संचालक, वनामकृवि, परभणी 

Saturday, August 16, 2014

आदिवासी शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा.......कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

वनामकृवित आदिवासी उपयोजनातंर्गत आदीवासी शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटप


परभणी : देशाच्‍या स्‍वातंत्र्यानंतरही आदिवासी समाज विकासापासुन दुर आहे, शासनाने आदिवासी विकासाकरिता अनेक योजना राबविल्‍या, त्‍याप्रभावीपणे राबविण्‍यासाठी या योजनेतील खर्च फक्‍त आदिवासी समाजाकरिताच व्‍हावा सक्‍तीचे केलेले आहे. शेतीसाठी पाण्‍याचा कार्यक्षमरित्‍या व काटेकोरपणे वापर करण्‍यासाठी तुषार व ठिबक सिंचनाचा वापर करणे अत्‍यावश्‍यक झाले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ आदिवासी शेतक-यांनी घ्‍यावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. स्‍वातंत्रदिनाचे औचित्‍यसाधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वीत संशोधन प्रकल्‍पातंर्गत पाणी व्‍यवस्‍थापन योजनामार्फत आदिवासी उपयोजनातंर्गत हिंगोली जिल्‍हयातील कळमनुरी तालुक्‍यातील वाई गांवातील आदीवासी शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटपाचा कार्यक्रम दि १५ ऑगस्‍ट रोजी आयोजित करण्‍यात आला होता. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते, याप्रसंगी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण, सरपंच श्रीमती कविताताई दुधाळकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले व प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ ए एस कडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या योजनेतंर्गत निवडक ४६ आदिवासी शेतक-यांना मान्‍यवारांच्‍या हस्‍ते तुषार सिंचन संचाचे वाटप करण्‍यात आले.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आदिवासी शेतक-यांनी पिक पध्‍दतीत बदल करून पारंपारिक पिकासोबतच फळपिकांकडे वळावे जेणेकरून आर्थिक समृध्‍दी होईल. विद्यापीठाने आदिवासीबहुल मौजे वाई हे गांव दत्‍तक घेऊन तेथे संपुर्ण कृषि क्रांतीसाठी प्रयत्‍न करण्‍याची सुचना त्‍यांनी केले.
याप्रसंगी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, शेतीत आदिवासी शेतक-यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्‍यास त्‍यांच्‍या जीवनात नवी पहाट येईल. याकरिता आदिवासी बांधवांनी विद्यापीठास संपुर्ण सहकार्य करावे याप्रकल्‍पामुळे आदिवासी समाज व विद्यापीठ यांच्‍यातील नाते अधिक दृढ होईल अशी मत त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी आदिवासी शेतक-यांचे औषधी वनस्‍पतीचे ज्ञान अत्‍यंत महत्‍वाचे असुन त्‍याक्षेत्रातही विद्यापीठाला कार्य करत येईल अशी मत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ ए एस कडाळे म्‍हणाले की, वाई हे गांवा संपुर्णपणे आदिवासीबहुल गांव असुन ये‍थील शेतीला पाणी देण्‍यासाठी पारंपारिक पध्‍दतीचा वापर केला जात असल्‍याने पिकांची उत्‍पादकता कमी आहे, योजनेचे लाभार्थ्‍यांची निवड सविस्‍तर सर्व्‍हेक्षण करून ग्रामसभेमार्फत करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे तुषार सिंचन संच वाटप प्रक्रिया पारदर्शकपणे करण्‍यात आली आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ जी डी गडदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ के टी जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रा कराड, गिराम, खराडे, कांबळे आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्‍या शेवटी तुषार सिंचना संचाच्‍या साहित्‍य गांवापर्यंत नेण्‍यासाठीची वाहनाची व्‍यवस्‍थाही प्रकल्‍पांतर्गत करण्‍यात आली होती, त्‍यावाहनास कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी हिरवा झेंडा दाखविला. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व वाई गांवाचे शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.



विद्यापीठ परिसर पॉलिथीनमुक्त करण्याचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांचे रासेयोच्या स्‍वयंसेवकांना आवाहन

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औजित्‍यासाधुन परिसर स्वच्छता व गाजरगवत निर्मुलन अभियान दि. १५ ऑगस्त २०१४ रोजी घेण्‍यात आले. या अभियानाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, याप्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डी एल  जाधव, परभणी कृषि म‍‍हाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, गोळेगांव, कृषि म‍‍हाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. 
राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या स्‍वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, गाजरगवत व पॉलिथीन पर्यावरणास व जनावरांच्‍या आरोग्‍याला हानीकारक असुन यामुळे गंभीर समस्या निर्माण होत आहेत, यासाठी वर्षभर विद्यापीठ परिसर पॉलिथीनमुक्त ठेवण्यासाठी स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका यांनी कार्य करावे.
याप्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, राष्‍ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविण्‍यात येणारे विविध कार्यक्रमामुळे विद्यार्थ्‍यामध्‍ये समाजाप्रती असलेली बांधीलकीची जाणीव होते. यात विद्यार्थ्‍यांनी सक्रिय सहभाग घ्‍यावा.
कार्यक्रम यशस्वितेसाठी राष्‍ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.एम.कांबळे व प्रा. व्हि. बी. जाधव यांच्‍या नेतृत्‍वाखाली स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Thursday, August 14, 2014

मोसंबी बागायतदारांचे प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन

बदनापुर जि जालना येथे दि 20 ऑगस्‍ट रोजी लिंबुवर्गीय फळपिकावर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियानांतर्गत मोसंबी बागायतदारांचे प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन