प्रशिक्षणार्थीनां मार्गदर्शन करतांना भुम येथील प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब पाटील, व्यासपीठावर कार्यक्रम समन्वयक डॉ व्ही जी टाकणखार, संशोधन उपसंचालक डॉ गजेंद्र लोंढे, डॉ खंदारे, श्री पुरी आदी |
तुळजापुर - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्र व आत्मा, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यामाने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पातंर्गत दि 2 ते 8 फेब्रुवारी दरम्यान दुध प्रक्रिया उद्योग यावर सात दिवशीय प्रशिक्षण उस्मानाबाद तालुक्यातील पाडळी येथे संपन्न झाले, दुध प्रक्रिया उद्योगास चालना मिळण्यासाठी हे राबविण्यात आले. प्रशिक्षणाचे उदघाटन भुम येथील प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यात 30 दुध उदत्पादक शेतकरांनी सहभाग घेतला. यात संशोधन उपसंचालक डॉ गजेंद्र लोंढे, डॉ ए टी शिंदे व श्री गिते या तज्ञांनी दुध प्रक्रिया पदार्थाचे आहारातील महत्व, दुध प्रक्रियेचे फायदे, दुधापासुन विविध पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. या दरम्यान यशस्वी विविध दुध संकलन संस्था व दुध प्रक्रिया उद्योगास भेटी देण्यात आल्या. या प्रशिक्षणाचे फलित म्हणजे पाडळी सहभागी दुध उत्पादकांनी लोकमंगल या नावाने दुध उत्पादक गट स्थापन करून साधारणता 250 लिटर दुध संकलनास प्रारंभ केला. प्रशिक्षणाचा समारोप दि 8 फेब्रुवारी 2014 रोजी झाला. कार्यक्रम यशसवीतेसाठी तुळजापुर कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ व्ही जी टाकणखार व उस्मानाबाद येथील आत्माचे संचालक श्री लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पशु संवर्धन व दुग्धशास्त्राच्या विषय विशेष तज्ञा डॉ अनिता जिंतुरकर, प्रा सौ मरवालीकर, प्रा कसबे, प्रा सुर्यवंशी, डॉ आरबाड, प्रा मंडलिक, श्री कालीदास साठे, बालाजी कदम, दिपक पवार, दत्ता पवार यांनी परिश्रम घेतले.