वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या गृहविज्ञान महाविद्यालयातर्फे दि
15 फेब्रवारी 2014 रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले
असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनामकृविचे कुलगूरू मा डॉ. बी. वेंकटेश्वरलु
राहणार असुन शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. विश्वास शिंदे यांची प्रमुख
उपस्थिती राहणार आहे. 1975 साली गृहविज्ञान महाविद्यालयाची स्थापन झाली असुन त्यापासुन
आजपर्यंनच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले
आहे. विद्यार्थ्याना त्यांच्या महावि़द्यालयीन जीवनास पुर्नउजाळा देण्यासाठी
तसेच परस्परांमध्ये व महाविद्यालयाशी त्यांचे घनिष्ठ स्नेहबंध कायम राहण्याच्या
प्रमुख उददेशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरवात
महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ठीक 9.00 होणार असुन महाविद्यालयाच्या सर्व
माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गृहविज्ञान महाविद्यालयाच्या
सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्या प्रा विशाला पटनम यांनी केले आहे.
Reunion of Home Science Alumni
A reunion of the home science alumni will be held on February 15 at the
auditorium of Home Science College of Vasantrao Naik Marathwada
Agriculture University in Parbhani.
The students who passed out from
1976 to 2013 will take part in the inaugural function to be organized by College of Home Science . Vice chancellor of VNMKV
Honble Dr B Venkateswarlu will preside over the function, while Director of
Instruction & Dean (F/A) Dr V.S.Shinde, Director of Extension Dr. A.S.Dhawan,
Director of Research Dr.D.P.Waskar and Registrar Shri K.V. Pagire will remain
present as guests on the dais. The function will begin on Saturday morning on
9.00 O’clock. Associate Dean Prof Vishala Patnam, Prof. Hemangin Sarmbekar and others
are taking efforts to make the programme a success.