वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालयाच्या आठव्या सत्रातील
अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमाच्या सत्तावीस विद्यार्थ्यांनी दि 20 फेब्रुवारी
रोजी रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे यांच्या
मार्गदर्शनाखाली दुबार रेशीम कोषाचे यशस्वी पीक काढणी केली. यावेळी कृषि
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी भोसले उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी यात दुबार रेशीम किटक संकर वाणाच्या अंडीपुजाची उबवण, ब्लॅक
बॉक्सींग, हॅचिंग, ब्रशिंग आदी बाबी पुर्ण केल्या. याप्रसंगी डॉ बी. बी भोसले म्हणाले
की, रेशीम उद्योग हा इतर पिकांच्या तुलनेत दर माह वर्षभर पगारासारखा पैसा देणारा उद्योग
असुन अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमाच्या विद्यार्थ्यांनी रेशीम उद्योगाचे
संपुर्ण कौशल्य प्राप्त करून भविष्यात या क्षेत्रात उद्योजक व्हावे. रेशीम
उद्योग हमखास चांगले उत्पादन देणारा शेतक-यांसमोरील पर्यायी उद्योग असल्याचे
सहभागी विद्यार्थ्यानी मत व्यक्त केले. या अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमाच्या आठव्या
सत्रातील विद्यार्थी एन. डी.मोरे, विपुल कुमार, व्ही.पी.देशमुख, ऐ.यु.ढवळे, एस.के.जोगु,
एस.बी. कळंबे, एस.ऐ.कादरी, प्रिती माला, रशमीकुमारी, एस.व्ही.ऊफाडे, एस.एस.गोरे,
जी.पी.मुके, पी.के.धनवे, एस.एम.शिंदे, व्हि. एम.शिराळे, ए.एम.कुलकर्णी, एस.ए.शेख,
डी.एम.हुडेकर, एम.आर.मस्के आदीचा समावेश होता.