वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातंर्गत कार्यरत असलेल्या सर्व महिला व पुरूष अधिकारी व कर्मचारी यांच्या
‘विद्यापीठ
कर्मचारी क्रीडा स्पर्धे 2014’ चे
आयोजन दिनांक 8 ते 10 मार्च दरम्यान करण्यात आले असुन दि 8 मार्च रोजी परभणी
कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ बी बी भोसले यांच्या हस्ते मशाल पेठवुन
स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे
सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख व विभाग
प्रमुख डॉ बी व्ही आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे उदघाटक डॉ बी
बी भोसले आपल्या भाषणात म्हणाले कि, कर्मचा-याच्या सर्वांगीण विकासाकरिता याप्रकारच्या खेळांचे आयोजन आवश्यक
असुन कर्मचा-यावरील कार्यलयीन दैनंदिन कामाचा ताण यामुळे कमी करण्यास मदत होते.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक डॉ महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. शाहु चौहान यांनी तर आभार
प्रदर्शन डॉ आशाताई देशमुख यांनी केले. या क्रीडास्पर्धेत हॉलीबॉल, टेबल टेनीस,
बॅडमिंटन, टेनिस बॉल क्रिकेट, कबड्डी, बुध्दीबळ, कॅरम, रांगोळी स्पर्धा आदी विविध
खेळांचा समावेश असुन विविध समित्याचे गठण करण्यात आले आहे. स्पर्धेचा बक्षिस
वितरण कार्यक्रम दिनांक 10 मार्च रोजी कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात
विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांच्या हस्ते होणार आहे.