वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत
असलेल्या राजमाता जिजाऊ मुलींचे वसतीगृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात
आला. गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता प्रा. विशाला पटणम
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर प्रा शुभांगी कलपांडे, डॉ शिल्पा
जेथलिया व डॉ जयश्री एकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना
सर्वांगीण विकास घडवुन चांगले करिअर व वैयक्तिक जीवनात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन
केले. यानिमित्य ‘मला
अशी स्त्री व्हायचंय’
या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कृषि महाविद्यालयाची
अथिरा रविंद्रन हिने प्रथम, गृहविज्ञान महाविद्यालयाची प्रतिभा ठोंबरे हिने व्दितीय तर
शिवशक्ती गोडसलवार व ज्योती बहिरट या विदयार्थिंनी तृतीय क्रमांक पटकवला. विजेत्यांचे प्रा. विशाला पटणम यांनी स्मृतीचिन्ह देऊन अभिनंदन केले तर मान्यवरांना देखिल
विद्यार्थ्यींनी स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेश्मा
मल्लेशे, वेदांती मुळे, अंकिता रत्नपारखी व ज्योती बहिरट या विद्यार्थ्यींनी परिश्रम
घेतले.